यावल दि.६
येथील नगरपरिषद संचलित पीएमश्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील पर्यवेक्षक व्ही.ए.काटकर यांचा मुलगा तथा सानेगुरुजी विद्यालयातील माजी विद्यार्थी डॉ.देवेंद्र विलास काटकर हा मुंबई येथील ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ( सर जे.जे.हॉस्पिटल ) येथून एमबीबीएस प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला.त्याचा पदवीदान समारंभ मुंबई येथे दि.२५ मार्च २०२५ रोजी श्री षण्मुखानंद चंद्रासेकारेंद्र सरस्वती हॉल.
सायन,येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.त्यावेळी त्याला शुभाशीर्वाद देण्यासाठी त्याचे आई,वडील,बहीण,भाऊ,याच्यासह नातेवाईक,
मित्रमंडळी,हितचिंतक,मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.त्याने आपल्या यशाचे श्रेय त्याचे आई,वडिल व शिक्षण क्षेत्रातील गुरुजनांना दिले आहे.
टिप्पणी पोस्ट करा