कर्तव्यदक्ष ग्रामपंचायत अधिकारी गौतम वाडे झाले विस्तार अधिकारी. संपूर्ण भुसावळ विभागातून कौतुकाचा वर्षाव.

यावल दि.२५ 
ग्रामस्थांचे प्रिय आणि ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कर्तव्यदक्ष,समय सूचकता बाळगून शासकीय कामकाज करणारे गौतम वाडे यांच्या शासकीय सेवेतील कामाची दखल घेत शासनाने त्यांना पदोन्नती दिल्याने ते आता विस्तार अधिकारी म्हणून आपले कामकाज करणार आहे.त्यांना पदोन्नती मिळाल्याने संपूर्ण भुसावळ विभागातून त्यांचे सर्व स्तरातून ग्रामीण भागातून कौतुक करण्यात येत आहे.

गौतम वाडे यांनी यावल तालुक्यात सर्वात प्रथम निमगाव,सांगवी खुर्द या ग्रामीण भागातून ग्रामपंचायत अधिकारी म्हणून शासकीय कामकाजाची सुरुवात केली. त्यानंतर साकळी - शिरसाड, ग्रामपंचायतीत ८ वर्ष, न्हावी प्र.यावल येथे ५ वर्ष, हिंगोणा २ व मारूळ ग्रामपंचायत येथे २ वर्ष, नंतर आमोदा येथे यानंतर रावेर तालुक्यात मोठा वाघोदा येथे, भुसावळ तालुक्यात साकेगाव २ वर्ष, वऱ्हाडसिम येथे २ वर्ष अशाप्रकारे त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ लोकप्रतिनिधी,पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी समन्वय साधून विविध विकासकामे केली आहे.
यावल तालुक्यात शिरसाड ग्रामपंचायतचा कार्यभार सांभाळताना त्यांना स्वच्छता अभियाना अंतर्गत पुरस्कार बक्षीस मिळाले आहे.त्यानंतर न्हावी ग्रामपंचायत मध्ये यशस्वी आणि विशेष शासकीय कामकाज केल्याने,राज्यस्तरीय उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले आहे यासोबत दलित सुधार योजनेअंतर्गत विशेष नियोजनबद्ध विकास कामे केल्याने न्हावी ग्रामपंचायतला प्रथम क्रमांक मिळाला आहे. 
कोरोना कालावधीत भुसावळ तालुक्यातील साकेगाव ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असताना त्यांनी अनेक गोरगरीब सर्वसामान्य जनतेचे प्राण वाचून योग्य ते मदत कार्य वेळेवर केल्याने आमदार संजय सावकारे यांनी त्यांचे अभिनंदन करून प्रमाणपत्र दिले आहे.अशाप्रकारे कर्तव्यदक्ष गौतम वाडे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांस विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाल्याने त्यांचे भुसावळ विभागातून पंचायत समिती कार्यक्षेत्रासह सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात