यावल दि.५
दि.६ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टी च्या स्थापना दिनानिमित्त रावेर- यावल विधानसभेतील प्रत्येक बूथ वरती भारतीय जनता पार्टीचा ध्वज फडकवला जाईल त्याचबरोबर सकाळी शासकीय रुग्णालयांमध्ये फळवाटप करण्यात येईल या मध्ये यावल ग्रामीण रुग्णालय, साकळी ग्रामीण रुग्णालया व न्हावी ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी होणार आहे.
दुपारी यावल येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा लाईव्ह कार्यक्रम शेतकी संघ यावल येथे होणार आहे.
प्रभू श्रीराम नवमी व भाजप स्थापना दिनानिमित्त सत्यनारायणाची पूजा करण्यात येणार असून संध्या 5 वाजता यावल मंडला शेतकी संघ मध्ये आयोजक भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे , फैजपूर मंडल मध्ये न्हावी येथे संध्याकाळी 6.30 वा. आयोजक नितीन चौधरी आणि यशवंत तळेले व किनगाव - साकळी मंडला मध्ये संध्या 5 वा.आयोजक रवींद्र सूर्यभान पाटील यांच्या नियोजनात या तीन मंडल ठिकाणी पूजा करण्यात येणार आहे.
त्याच बरोबर रावेर तालुक्यातील रावेर पूर्व, रावेर पश्चिम आणि सावदा मंडळ या ठिकाणी देखील प्रभू श्रीराम नवमी व भाजप स्थापना दिनानिमित्त सत्यनारायण पूजा करण्यात येणार आहे.
वरील सर्व कार्यक्रमांना आप आपल्या स्थानिक स्तरावरील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमांना उपस्थित रहावे.असे आवाहन जिल्हाध्यक्ष आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी केले असल्याचे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात उमेश फेगडे,यावल
तालुकाध्यक्ष,विलास चौधरी तालुका सरचिटणीस उज्जैनसिंग राजपूत यावल तालुका सरचिटणीस यांनी म्हटले आहे.
टिप्पणी पोस्ट करा