खरीप पिक विमा २०२४ व बीटी वाण यासह विविध मागण्यांसाठी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने पारोळा तहसीलदारांना दिले निवेदन.



यावल दि.१७ 
खरीप पिक विमा २०२४ व बीटी वाण यासह विविध मागण्यांसाठी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे पारोळा येथील तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले.खरीप हंगाम 
२०२५ मध्ये शेतकऱ्यांचा कापूस,मका,ज्वारी बाजरी उडीद मूग सोयाबीन अशा विविध पिकांची शेतकऱ्यांनी पेरणी केली परंतु जून महिन्यापासून सततचा पाऊस म्हणजेच अतिवृष्टी अशा अतिवृष्टीने सप्टेंबर अखेरपर्यंत रिप - रिप पावसाने कापूस ज्वारी बाजरी मका सोयाबीन उडीद मूग या पिकांची नासधूस केली परिणामी कापूस या पिकाच्या कैऱ्या सडून दुर्गंध युक्त उग्र स्वरूपाचा वास येऊन परिणामी बोंड आळीचा प्रादुर्भाव होऊन शेतकऱ्यांच्या पिकाला जणू काही वरून राजाची नजर लागली.
शेतकऱ्यांनी पाहिलेले हिरवे स्वप्न डोळ्यासमोर चकनाचूर होऊन शेतकरी हतबल झाला अशा सततच्या पावसाने शेतकऱ्याचे चांगलेच कंबरडे मोडले.
शासन व सरकार पिक विमा कंपनी यांनी खरीप २०२४ चा पिक विमा मंजूर करावा अशी मागणी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना जळगाव पारोळा च्या वतीने तहसील कार्यालय तसेच कृषी विभाग कार्यालय यांना निवेदन दिले शेतकऱ्यांच्या मागण्या, कापूस बोलगार्ड १ व बोल गार्ड २ हे वाण बोंड आळी ला प्रतिकार करत नसल्याने पुढील उच्चतंत्रज्ञान म्हणजे जी एम कापसामध्ये वापरावे, पंतप्रधान सन्मान निधीचे बरेचसे लाभार्थी तहसील व कृषी आवारात चकरा मारतात त्यांचा प्रश्न निकाली काढून त्वरित त्यांना न्याय द्यावा मागील वर्षाचे कापूस सोयाबीन उर्वरित शेतकरी अनुदान लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या अकाउंटला देण्यात यावे वन्य प्राण्यांपासून शेती पिकांचे संरक्षण होण्यासह शासनाने अनुदानावर कुंपण योजना तौरीत राबवावी खरीप पिक विमा २०२४ चा लाभ त्वरित द्यावा अशा विविध प्रकारच्या मागण्यांसाठी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने तहसीलदार अनिल पाटील तसेच कृषी अधिकारी दीपक अहिर यांना निवेदन दिले. 
     यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील तालुका अध्यक्ष प्राध्यापक बिकनराव पाटील,संघटक गुलाब पाटील,भाऊसाहेब पाटील,
गुलाब वाघ, कौतिक चौधरी,निलेश देशमुख, किरण पाटील,सुरेश पाटील,कलश शिंपी,मच्छिंद्र पाटील,
गोरख पाटील,विकास पाटील,कृष्णाकांत पाटील,
ज्ञानेश्वर पाटील,योगराज पाटील,रामभाऊ पाटील,
नारायण पाटील,संजय केदार,अनिल पाटील,जगदीश पाटील यासह तालुक्यातील बरेचसे शेतकरी पारोळा तहसीलदार व पारोळा तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देताना उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात