सीटीईटी ( CTET ) परीक्षेत मारूळ येथील सैय्यद मोहम्मद याचा विक्रम.


यावल दि.८
केंद्र शिक्षक पात्रता परीक्षेत ( CTET ) यावल तालुक्यातील मारूळ येथील ऍग्रो उर्दू हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक मुसरतअली सैय्यद यांचे पुत्र सैय्यद मोहम्मद हूजैफा यांनी केंद्र शिक्षक पात्रता परीक्षेत विक्रमी यश संपादन केले आहे त्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे त्यांची शैक्षणिक पात्रता BADEd ( I ) अशी आहे ते २०२३ मध्ये DEd उत्तीर्ण झाले आता त्यांनी प्रथम श्रेणी परीक्षा ( CTET ) १ ते ५ मध्ये ९२ गुण मिळविले व उत्तीर्ण झाले.तसेच द्वितीय लेखी परीक्षा CTET ( ६ ते ८ ) १०३ इतक्या विक्रमी गुणांनी उत्तीर्ण केली त्यामुळे शिक्षण व सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे त्यांनी या दोन्ही परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण केल्या यापुढे ते आणखी उच्च शिक्षण घेण्याचा त्यांचा प्रयत्न करणार आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात