यावल दि.१९
यावल येथील नगरपरिषद संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात, सरदार वल्लभभाई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये, शिवाजीनगर मधील श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ तर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावल येथील नगरपालिका संचलित पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील कलाध्यापक तथा पर्यवेक्षक विजय नन्नवरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प साकारून शिल्पकलेतून मानवंदना दिली.
यावल नगरपरिषद संचलित
पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,यावल येथे आज बुधवार दि.१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण विद्यालयाचे मुख्याध्यापक साहेब एम.के.पाटील सर यांनी केले यावेळी उपप्राचार्य ए.एस.इंगळे सर,पर्यवेक्षक व्ही.ए.काटकर सर, व्ही.टी.नन्नवरे सर,ज्येष्ठ शिक्षक डी.एस.फेगडे सर,पी.एन.सोनवणे सर,एन.डी.नेवे सर,कार्यालयीन अधीक्षक एन.के.बारी, बारी भाऊसाहेब तसेच सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षिकेतर कर्मचारी बंधू -भगिनी उपस्थित होते,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्सव समिती प्रमुख श्रीमती इंदिरा रायसिंग मॅडम यांनी केले तसेच विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक एन.डी. नेवे सर,ए.एस.सोनवणे सर, डी.आर.देशमुख सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले,अध्यक्षीय भाषणात विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.के.पाटील सर यांनी मार्गदर्शन केले,कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी सहकार्य केले.
यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र.प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे व उपप्राचार्य प्रा. एम.डी.खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.विद्यार्थिनी भाग्यश्री भोई हिने छ.शिवाजी महाराजांवर मनोगत व्यक्त केले.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अमोल भालेराव
( उपशिक्षक सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम शाळा यावल ) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की छ. शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते.राजमाता जिजाऊ,वडील सेनापती शहाजीराजे भोसले यांच्या संस्कारशील वातावरणात कुशाग्र बुद्धिमत्ता निर्माण केली.त्यांना गडकिल्ल्यांचे अचूक ज्ञान, पर्यावरण,कृषी संस्कृती,समुद्रातील आरमार,स्त्रियांचा सन्मान केला. त्यांनी गनिमी कावा,युद्ध पध्दती विकसित केली.अनेक किल्ल्यांचे संवर्धन केले.याबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुधीर कापडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की छ. शिवाजी महाराज हे अठरा पगड जातीच्या जनतेचे राजे होते,ज्यांनी वयाच्या १६ व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले,वयाचे १३ व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला,रयतेच्या कल्याणासाठी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले,समाजात थोर व्यक्तींचा हात जोडून(नमस्कार) शिष्टाचार करण्याची पद्धती अशी संस्कारशील पद्धत महाराजांनी जोपासली याचा आजही सन्मान होत आहे. जागतिक स्तरावरही महाराजांचे आदर्शाचे स्थान आहे.असे सांगितले
कार्यक्रमाच्या
दुसऱ्या सत्रात शिवाजी महाराज जयंती निमित्त निबंध लेखन स्पर्धा पार पडली त्यात वैभवी पाटील प्रथम ( तृतीय वर्ष वाणिज्य ) दिव्या पाटील द्वितीय ( प्रथम वर्ष कला ) रोहित नलावडे तृतीय ( तृतीय वर्ष बी.ए कला ) हे क्रमांकाचे मानकरी ठरले. यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सुभाष कामडी यांनी केले.सूत्रसंचालन डॉ. संतोष जाधव यांनी केले तर आभार प्रा.रामेश्वर निंबाळकर यांनी मानले.यावेळी कार्यक्रमाला महाविद्यालयाचे कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा.संजय पाटील,डॉ. हेमंत भंगाळे,डॉ.आर डी पवार,प्रा. मनोज पाटील उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.वैशाली कोष्टी,प्रा.नरेंद्र पाटील,प्रा. प्रतिभा रावते,प्रा.भावना बारी,प्रा. हेमंत पाटील,प्रा.प्रशांत मोरे,प्रा.रूपाली शिरसाट, प्रा.इमरान खान, प्रा.आश्विनी कोल्हे,मिलिंद बोरघडे,संतोष ठाकूर,दुर्गादास चौधरी,प्रमोद भोईटे,प्रमोद कदम,दशरथ पाटील, रमेश साठे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावल येथील श्री मनुदेवी आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूल शाळेत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला. कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शिला तायडे मॅडम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 'शूरता हा माझा आत्मा आहे, विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे, क्षत्रिय हा माझा धर्म आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे माझे दैवत आहे.' या कार्यक्रमातून पटवून देण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शीला तायडे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.त्यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
जय भवानी,जय शिवाजी श्री छत्रपति शिवाजी महाराज मित्र मंडळ यावल यांचे कडून श्री शिवजन्मोउत्सव सोहळा दि.१९ फेब्रुवारी २०२५ बुधवार रोजी संध्या ६ वाजता श्री छत्रपती शिवाजीमहाराज नगर यावल या ठिकाणी मान्यवरांचे हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतीमेचे पूजन करून नंतर मान्यवरांचे हस्ते दिपक पाटील यांनी श्री शिवाजी महाराज यांचे जिवनावर लिहिलेल्या गीत लेखन,हस्त लिखित पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.या पुस्तिकेत महाराजांची आरती व महाराजांच्या जिवनावरील गित लेखन श्री दिपक पाटील यावल. यांनी केले असून,लवकरच या गीतांची,ऑडिओ,व्हिडीओ चित्रीकरण करण्याचा त्यांचा विचार आहे.....तरी या कार्यक्रमास शिवाजीनगर परिसरातील मोठ्या संख्येने सर्व स्तरातील नागरिक, शिवभक्त उपस्थित होते अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळा तर्फे प्रा.मुकेश येवले यांनी दिली. अशाप्रकारे यावल शहरात ठीक ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा