यावल दि.३
शहरातील छत्रपती शिवाजी नगर भागातील श्री मारोती मंदीरात २ फेब्रुवारी ला रात्री ७ वाजता समस्त सनातनी हिंदूंच्या वतीने सामूहिक श्री हनुमान चालीसा आणि महाआरती करण्यात आली.या वेळी परिसरातील लोकप्रतिनिधी, युवा कार्यकर्ते,महिला यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून मोठ्या भक्ती भावाने महाआरती केली. रस्त्यावरील दुकानात आलेले ग्राहक आणि त्या दुकानांचे मालक हे ही स्वयंस्फूर्तीने या आरती मध्ये सहभागी झाले होते.या आरतीला यावेळी छत्रपती शिवाजी नगर भागातील माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे, भाजपचे माजी नगरसेवक राजेंद्र मराठे,तुषार सुर्यवंशी,विनायक पाटील,महेश चौधरी,विजय बांदल, उत्तम शिंदे,अंकुश कोळी,यांसह ६०० पेक्षा अधिक,हिंदू धर्माभिमानी,युवक,महिला आणि नागरिक उपस्थीत होते.
पुढील महाआरती २ मार्च ला तपस्वी हनुमान मंदिर, शाहू नगर येथे !
शहरातील विविध भागांतील सनातनी हिंदूंचे संघटन व्हावे आणि राम राज्य अर्थात हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी भगवंताची कृपा प्राप्त करण्यासाठी हिंदूंकडून सामूहिक उपासना घडावी, या उद्देशाने महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागृती समितीच्या वतीने शहरात प्रत्येक महिन्यातील पहिल्या रविवारी असे महाआरतीचे आयोजन करण्यात येणार असून पुढील महाआरती रविवार, २ मार्च या दिवशी सायं ७ वाजता शाहू नगर मधील श्री तपस्वी हनुमान मंदिरात होणार आहे. त्याला अधिकाधिक हिंदू बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन महाआरती समितीच्या वतीने सर्वश्री गजानन तांबट, आशिष गांगवे, नीलकंठ चौधरी, संजय दीक्षित, संजय येवले, जयेश कुलकर्णी,अनिल चौधरी,धनंजय पाटील,रवींद्र हेंबाडे यांनी केले. असल्याचे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात हिंदू जनजागृती समिती उत्तर महाराष्ट्र संघटक प्रशांत हेमंत जुवेकर यांनी म्हटले आहे.
टिप्पणी पोस्ट करा