यावल दि.२३
यावल येथील श्री जीवा महाले नाभिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र शासन तथा पालकमंत्री श्री संजय सावकारे, रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री अमोलदादा जावळे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नाभिक संघ भुसावळ शहर भुसावळचे अध्यक्ष संजय बोरसे, प्रमुख पाहुणे म्हणून अ.भा. जीवसेना युवा जिल्हाध्यक्षअनिल टोंगे,जिल्हाध्यक्ष गणेश सेठी, सुधाकर सनानसे,उमेश फेगडे,डॉ. अभय रावते,रफिक सर,नंदा महाजन,सुरेश ठाकरे,किशोर श्रीखंडे,गिरीश पगारे आदी उपस्थित होते.सदर सत्कार प्रसंगी मा.ना.संजयजी सावकार साहेब यांचा सत्कार जिवा महाले नाभिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा पदाधिकारी या सर्वांच्या हस्ते नाभिक समाजाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला व आमदार अमोलदादा जावळे यांचा सन्मान सत्कार जीवा महाले नाभिक बहुउद्देशीय दुकानदार संघटना यांच्या हस्ते सन्मान व सत्कार करण्यात आला.सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे डॉ.नरेंद्र महाले यांना देखील शैक्षणिक कारकीर्दीत राष्ट्रीय व राज्य स्तरावरील पुरस्कार मिळाल्याबद्दल व लोकसभा विधानसभेमध्ये मतदान जनजागृती साठी उत्तम असे कार्य केल्याबद्दल मंत्री संजयजी सावकारी साहेब व आमदार अमोल जावळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.आपल्या प्रास्ताविकात जीवा महाले बहुउद्देशीय नाभिक संस्थेचे अध्यक्ष अनिल चौधरी यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा सांगितला.मा. मंत्री संजय सावकारे साहेब यांनी नाभिक समाजाच्या सहकार्याचा पुनरुच्चार करत समाजाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर समाजाच्या अडीअडचणींना सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असण्याचे देखील सांगितले.समाजाला सामाजिक सांस्कृतिक स्तरावर सभागृह असो किंवा अन्य मतदार यासाठी मदत करण्यासाठी नेहमी सोबत असल्याचे सांगितले. आमदार अमोलदादा जावळे यांनी समाजात नाभिक समाजाच्या यावल शहरातील सांस्कृतिक, सामाजिक सभागृहासाठी नेहमी प्रयत्नशील राहून पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न करेल या शब्दात सर्व समाज बांधवांना आश्वासन दिले व नाभिक समाजाचे जाहीर ऋण व्यक्त केले.या प्रसंगी चर्मकार संघटनेने देखील मान्यवरांचा सत्कार केला.आपल्या अध्यक्ष भाषणात संजयजी बोरसे यांनी समाजाला उत्तम संघटनाची आवश्यकता असून सर्वांनी यासाठी प्रयत्न करावे असे मार्गदर्शन केले . कार्यक्रमाला भुसावळ रावेर या तालुक्यातून मोठ्या संख्येने नाभिक समाज बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जीवा महाले नाभिक बहुउद्देशीय संघटनेचे पदाधिकारी तथा दुकानदार संघटनेचे पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार डॉ.नरेंद्र महाले यांनी केले.
विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ट काम केल्याने डॉ.महाले यांचा सत्कार --
सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे डॉ.नरेंद्र महाले यांना देखील शैक्षणिक कारकीर्दीत राष्ट्रीय व राज्य स्तरावरील पुरस्कार मिळाल्याबद्दल व लोकसभा विधानसभेमध्ये मतदान जनजागृती साठी उत्तम असे कार्य केल्याबद्दल मा.ना.संजय सावकारे व आमदार अमोलदादा जावळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा