यावल दि.१८
जळगाव येथील नगर भूमापन अधिकारी कार्यालयातील खाजगी कर्मचारी अविनाश सदाशिव सनंसे वय ४९ यांने फिर्यादीच्या आजोबाच्या नावे असलेल्या प्लॉटवर वारस लावण्याचे, हक्क सोड करण्याची व कर्जाच्या बोजाची नोंद घेण्यासाठी पंधरा हजार रुपये मागणी करून कामाची सुरुवात करण्यासाठी १ हजार रुपयाची लाच घेताना जळगाव येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना आज मंगळवार दि.१८फेब्रुवारी २०२५ रोजी घडल्याने शासकीय यंत्रणात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,तक्रारदार यांच्या आजोबांच्या नावे असलेल्या प्लॉटवर वारस लावण्याचे, हक्क सोड करण्याचे व कर्जाच्या बोजाची नोंद घेण्याच्या साठी नमुद खाजगी इसम यांनी तक्रारदार यांच्याकडे नगर भुमापन अधिकारी कार्यालयातील साहेबांकडून सदर काम करुन आणुन देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे प्रथम प्रत्येक नोंद घेण्यासाठी १५ हजार व कामाला सुरूवात करुन देण्यासाठी १५०० रुपयाची मागणी करून तडजोडीअंती १००० रुपयाची लाच पंचासमक्ष स्विकारली म्हणून आरोपी यांचे विरुध्द जिल्हा पेठ पोलीस स्टेशन,जळगांव, येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ अ अन्वये गुन्हा दाखल प्रकिया चालू आहे.सदरची कारवाई श्रीमती शर्मिष्ठा घारगे- वालावलकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि,नाशिक परीक्षेत्र, नाशिक
मो.न. 9371957391पर्यवेक्षण अधिकारी योगेश ठाकूर पोलीस उप अधीक्षक लाप्रवि जळगांव मो. क्र 9702433131 यांच्या मार्गदर्शनाखाली
सापळा अधिकारी / दाखल अधिकारी / तपास अधिकारी श्रीमती स्मिता नवघरे पोलीस निरीक्षक ला. प्र. वि. जळगांव सापळा पथक’ पो.कॉ. / राकेश दुसाणे पो कॉ/ अमोल सुर्यवंशी यांनी केली.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणत्याही खाजगी इसम याने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगांव येथे संपर्क करावा.
दुरध्वनी क्रमांक 02572235477
टोल फ्री क्रमांक 1064 ’याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगांव येथे संपर्क करावा दुरध्वनी क्रमांक.
02572235477 ’टोल फ्री क्रमांक १०६४ आहे.
टिप्पणी पोस्ट करा