यावल दि.१९
यावल येथील बाल संस्कार विद्या मंदिरात श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आज बुधवार दि.१९ फेब्रुवारी २०२५ रोजी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.
इयत्ता १ ली ते ७ वी च्या विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा २ गटात आयोजित करण्यात आली.सदर कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण शाळेचे मुख्याध्यापक सुनील माळी सर यांच्या हस्ते करण्यात आले.वक्तृत्व स्पर्धेत शाळेतील २५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यापैकी प्रथम गट इयत्ता १ ली ते ४ थी प्रथम रिद्धी पंकज गडे,द्वितीय गट इयत्ता ५ वी ते ७ वी प्रथम सानवी पंकज गडे द्वितीय दामिनी विकास फालक
यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचे पुस्तके वाचून त्यांचे कर्तृत्व आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा असे आवाहन अध्यक्षीय भाषणात शाळेचे मुख्याध्यापक यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रशांत महाजन सर,छायाचित्र व्हिडिओ चित्रीकरण अतुल पवार सर यांनी केले.सदर कार्यक्रमास शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा