यावल येथे श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा जय्यत तयारी सुरू.


यावल दि.१८
येथील विरारनगर मधील श्री गजानन महाराज मंदिरात श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा साजरा करण्याची जय्यत तयारी सुरू आहे.

माग वद्य सप्तमी गुरुवार दि.२० फेब्रुवारी २०२५ रोजी सालाबाद प्रमाणे श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो त्या निमित्ताने गुरुवार दि.२० रोजी सकाळी ६ वाजता श्री च्या मूर्तीस अभिषेक व आरती करण्यात येईल, सकाळी ७ वाजता श्री गणेश याग, ८ वाजता श्री रेणुका देवी मंदिरापासून श्री च्या पादुकांची पालखी मिरवणूक, दुपारी १२ वाजता श्री गणेश याग पूर्णाहूती व महाआरती, दुपारी १२:३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप,याच दरम्यान दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत श्री तारकेश्वर भजनी मंडळ यावल यांचा भजनाचा कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता श्री गजानन महाराजांची आरती,रात्री ८ वाजता 
ह.भ.प.सौ. राधाताई पाटील भोलाणेकर यांचे कीर्तनाचा कार्यक्रम अशा प्रकारे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन यावल येथील श्री गजानन महाराज मंदिर संस्थान अध्यक्ष व सदस्या तर्फे करण्यात आले आहे तरी यावल शहरातील भाविक,श्रद्धाळू भक्तगणांनी श्री गजानन महाराजांच्या तेजस्वी मूर्ती दर्शनाचा लाभ,महाप्रसाद व कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

प्रकट दिन सोहळ्यात विशेष म्हणजे दि.१७ फेब्रुवारी २०२५ पासून दि.१९ पर्यंत सकाळी ६ वाजेपासून श्री गजानन महाराज विजय ग्रंथाचे ३ दिवसीय सामूहिक पारायण आयोजित केले आहे यात ज्यांना सहभाग घ्यायचा असेल त्यांनी श्री गजानन विजय ग्रंथासह सकाळी ठीक ५:४५ वाजेपर्यंत उपस्थित राहावे, तसेच ज्या भाविकांना महाप्रसादात सहभाग घ्यायचा असेल त्यांनी २१,२१,५१ चपाती,पोळ्या किंवा भाकरी मंदिरात गुरुवार दि.२० फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत आणाव्यात असे सुद्धा श्री गजानन महाराज मंदिर संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात