व्यसनाच्या विळख्यात युवा पिढी. प्रा.रामेश्वर निंबाळकर.

यावल दि.२८
जगातील सर्वात तरुण देश तो म्हणजे भारत देश होय.देशाचे भविष्य हे तरुणांवर अवलंबून आहे. तरुण ही देशाची ऊर्जा आहे. आजचे तरुण शिक्षण कला, क्रीडा,विज्ञान,साहित्य अशा सर्व क्षेत्रात पुढे आहेत.या तरुणांची ऊर्जा हे देश कार्यासाठी देशाच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरत आहे. ज्या तरुणांच्या जोरावर आपण महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत आहोत तोच तरुण आज व्यसनाच्या आहारी जात आहे हे पाहून मन खिन्न होते.असे प्रत्येकाने आत्मचिंतन करणारे मनोगत प्राध्यापक रामेश्वर निंबाळकर यांनी व्यक्त केले आहे

बिडी ,सिगारेट ओढणे ,तंबाखू ,दारू चरस ,भांग ,ब्राऊन शुगर ,मावा (सुगंधी तंबाखू )इत्यादी व्यसनाच्या आहारी जाऊन स्वतःच्या आयुष्याचे राख रांगोळी करत आहेत. व्यसन म्हणजे काय? तर कुठल्या ही गोष्टीचा जेव्हा एखादा व्यक्ती अतिरेक करायला लागतो सवयच्या सुद्धा पुढे जेव्हा ती गोष्ट जाते आणि ती गोष्ट त्याला मिळाली नाही तर त्याला खूप त्रास व्हायला लागतो तेव्हा आपण असं म्हणतो की त्या व्यक्तीला व्यसन लागलाय मग ते अंमली पदार्थांचे असू दे किंवा सवयीच असू दे. 
बऱ्याचदा हे फक्त अनुभवासाठी घेतात आणि लवकरच ते व्यसनाधीन होतात. बऱ्याच वेळा व्यसन हे जवळच्या व्यक्तीकडून मित्राकडून, नातेसंबंधांकडून तसेच सिनेमा, नाटक ,मालिका यातून दाखवलेल्या धूम्रपान करणारा नायक याचे अनुकरण ही सुद्धा व्यसनाकडे आकर्षण उत्पन्न करणारी बाब असू शकते. 
परंतु या व्यसनाचे आपल्या शरीरावर किती? भयानक !परिणाम होतात याचा विचार आजचा तरुण वर्ग करताना दिसत नाही. या मादक पदार्थांच्या सेवनाने दात ,घसा , फुफ्फुसे,हृदय ,जठर मूत्रपिंड तसेच श्वसन संस्था आणि पचन संस्था यांचे विकार होऊन कर्करोग व इतर भयंकर रोग होतात. यकृत (लिव्हर) दारू हे थेट लिव्हरला हानी पोहोचवते.
सिरोसिस सारखे गंभीर आजार होतात. तसेच या नशेमुळे मूत्रपिंड रक्त शुद्ध करण्याची क्षमता गमावततात त्यामुळे शरीरात विषारी पदार्थ साठून राहतात.
शरीराप्रमाणे व्यसनाचे मानसिक दुष्परिणाम सुद्धा खूप घातक होतात मन व बुद्धी अकार्यक्षम बनते. व मानसिक त्रास सुरू होतो. सतत चिडचिड होणे.काम,क्रोध
लोभ,मद,मत्सर इत्यादी विकार वाढत जातात मनात सतत नकारात्मकतेची भावना वाढत जाते स्वतःमधील आत्मविश्वास नाहीसा होतो, अनामिक भीती वाढते. 
यासारखी भयंकर कारणे व्यसनाच्या सेवनाने होतात व्यसनरूपी सर्पाने तरुण पिढीला गिळण्यास सुरुवात केली आहे. यासाठी आपण सर्वांनी मिळून तरुणांमधील वाढती व्यसनाधीनता जर कमी करायची असेल तर दिशादर्शक विकासात्मक उपक्रम राबविले पाहिजेत. तरुणांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाची जाणीव होण्यासाठी शाळा,विद्यालय,
महाविद्यालय तसेच प्रसारमाध्यम यातून प्रबोधनाची आवश्यकता आहे.भारत सरकार व महाराष्ट्र राज्याने गेल्या कित्येक वर्षापासून व्यसनमुक्तीसाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत पिढीला व्यसनमुक्त करण्यासाठी निव्वळ योजना राबवून उपयोग नाही तर या पिढीला व्यसनाची दुष्परिणाम व मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे मग यासाठी समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींनी सहकार्य केल्यास आपण समाजाला विशेष करून तरुण पिढीला व्यसनमुक्त करू शकू व्यसनमुक्त भारत निर्माण करण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करून व्यसनाला हद्दपार करूया.व खऱ्या अर्थाने भारताला निरोगी व व्यसनमुक्त बनवू या असे प्रत्येकाने आत्मचिंतन करणारे मार्गदर्शक मनोगत प्राध्यापक रामेश्वर निंबाळकर यांनी व्यक्त केले आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात