यावल दि.३१
यावल वन विभाग उपवन संरक्षक यांच्यासह यावल येथील पूर्व व पश्चिम वनपरिक्षेत्र अधिकारी हे अवैध वृक्ष तोडीकडे आणि त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) मागासवर्गीय यावल शहराध्यक्ष कामराज घारू यांनी केला आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की,२६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी यावल भुसावळ रोडवर सकाळी चार ते पाच वाजेच्या सुमारास पाटाजवळ पिरोबा देवस्थानाजवळ जिवंत कव्हूट वृक्षाचे झाड अज्ञात चोरट्याने तोडून विल्हेवाट लावली याबाबतची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट ) मागासवर्गीय यावल शहराध्यक्ष कामराज घारू यांनी संबंधित अधिकारी व नाके कारकून यांच्याकडे केल्यावर सुद्धा कारवाई न झाल्याने जळगाव येथील यावल वन विभागाचे उपवन संरक्षक आणि यावल येथील पूर्व आणि पश्चिम वनपरिक्षेत्र अधिकारी संबंधित नाके कारकून आणि अवैध वृक्षतोड करणाऱ्यांचे संगनमत असल्याने यांचे यांच्या कार्यक्षेत्रातील वृक्षतोडीकडे आणि आलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कामराज घारू यांनी केला आहे.
पूर्व व पश्चिम वनक्षेत्रपाल यांच्या कार्यक्षेत्रात सर्रासपणे सागवान, खैर,बाभुळ,लिंब,भोकर इत्यादी मूल्यवान वृक्षतोड होऊन अवैध वाहतुक सुरू आहे यात संबंधित नाकेकारकून बिना पास लाकडाचे वाहन ४०७ सोडण्यासाठी बाराशे रुपये, छोटा हत्ती वाहन सोडण्याचे पाचशे रुपये घेतात अशी तालुक्यात अवैध लाकडाचा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये चर्चा आहे.
टिप्पणी पोस्ट करा