यावल दि.२७
आपल्या जळगाव जिल्ह्यात रविवार दि.२६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनाचा ७५ वा वर्धापन दिन समारंभ ठिकठिकाणी शासकीय अधिकारी,कर्मचारी लोकप्रतिनिधी,नागरिक,स्री -पुरुष विद्यार्थी,विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.परंतु एका ठिकाणी एका जबाबदार शासकीय अधिकाऱ्यांने मद्य प्राशन केलेल्या धुंदीत कोण काय वाकडे करून घेणार..? असे म्हणत तब्बल १३ मिनिट उशिराने ध्वजारोहण केल्याची चर्चा संपूर्ण यावल तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली,ही चर्चा खोटी आहे किंवा खरी..? याबाबतची चौकशी जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद साहेब यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील गोपनीय यंत्रणेमार्फत किंवा त्या मद्य प्राशन करणाऱ्याचे विभागीय वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत तपास चौकशी करून संबंधित अधिकारी खरोखरच माझे कोण वाकडे करून घेणार... असे म्हणत १३ मिनिट उशिराने ध्वजारोहण केले आहे किंवा नाही याबाबतचे सीसीटीव्ही रिपोर्ट मागवून कारवाई करावी किंवा त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज नष्ट केले आहे किंवा कसे..? त्या ठिकाणी सीसीटीव्ही कार्यरत का नाही..? आणि सीसीटीव्ही कार्यरत असतील तर त्या ठिकाणचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम निश्चितच सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असेल असे संपूर्ण यावल तालुक्यात चर्चा आहे.ही चर्चा खरी आहे की खोटी याबाबतचे आव्हान जिल्हाधिकारी जळगाव यांच्या प्रशासनाला असून त्या अधिकाऱ्याने खरोखरच मद्य प्राशन करीत १३ मिनिट उशिराने ध्वजारोहण केले असेल तर त्याविरुद्ध कारवाई काय होणार..? याकडे आता सर्वांचे लक्ष वेधून आहे.
टिप्पणी पोस्ट करा