यावल दि.२४
यावल नगरपरिषद कंत्राटी पाणीपुरवठा कर्मचारी यांच्या दि.२३ रोजी एकाने चमकोगिरी करीत येतो पुरस्कार खोटे आरोप केल्याबाबत यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन खोटे आरोप करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली.
मुख्याधिकारी नगरपरिषद यावल यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की तडवी कॉलनीतील जलकुंभ येथे हेमंत अनिल फेगडे हे कर्मचारी
सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत कार्यरत होते.तेथील काही नागरीकांनी न.पा पाणी पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार केली की,हेमंत अनिल फेगडे या कर्मचाऱ्याने पाण्याच्या टाकीवर लघुशंका केली असा खोटा आरोप करण्यात आला व त्या संदर्भात नगरपालीका मुख्याधिकारी यांच्याकडे दिनांक २३/०१/२०२५ रोजी तक्रार करण्यात आली.
तरी आमची मागणी आहे की,सदर केलेली तकार ही हेतु पुरस्कर व खोटी तक्रार केलेली आहे.याआधी सुध्दा सबंधीत कर्मचारी याला काही युवकांकडुन धमकी देण्यात आली होती व याआधी तेथे कार्यरत असलेले दुसरे कर्मचारी यांच्यावर दगडफेक करण्यात आली होती.असे अनेक प्रकार त्याठिकाणी तेथे कार्यरत असलेले युवक कर्मचारी यांच्यावर नेहमी
होत असतात तरी सदर झालेले आरोप हे तथ्यहीन असुन तक्रारदार हे संबंधीत कर्मचारी यांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे.तरी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून कार्यवाही करावी.व तेथे कार्यरत असलेले त्या युवक कर्मचारी यांच्यावर होत असलेले खोटे आरोप,दगडफेक, धमकी बाबतीत न.पा. प्रशासनाने दखल घ्यावी.सदर कर्मचाऱ्याला आज सुध्दा काही युवकांकडुन धमक्या देण्यात आल्या आहे.तरी त्यासंदर्भात त्या कर्मचाऱ्याचे
काही बरे वाईट झाल्यास संबंधीत तक्रारदार व न.पा.प्रशासन जबाबदार राहील.सदर प्रकरणात हेमंत अनिल फेगडे यांच्यावर विना चौकशी काही कार्यवाही झाल्यास शिवरत्न फाऊंडेशन छत्रपती ग्रूप बोरावल गेट यावल यांच्यातर्फे न.पा.समोर आंदोलन करण्यात येईल.असे दिलेल्या निवेदनात शिवरत्न फाउंडेशन अध्यक्ष किशोर माळी,नरेंद्र शिंदे,सागर लोहार, भरत भोई,आकाश धनगर,किरण भोई,हेमंत फेगडे,भरत बारेला, समीर तडवी,पार्थ सोनवणे,नंदू कदम,तुषार माळी, यांनी आपली स्वाक्षरी करून नमूद केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा