होमगार्ड पथक वर्धापन दिनानिमित्त यावल शहरात स्वच्छता मोहीम राबविली.


यावल दि. ८ 
दि.८ डिसेंबर १९४६ साली गृहरक्षक दल होमगार्ड संघटनेची स्थापना करण्यात आली होती आणि आहे. त्या निमित्ताने अशोक नखाते जिल्हा समादेशक होमगार्डस् तथा अप्पर पोलीस अधीक्षक जळगांव यांच्या आदेशानुसार यावल पथकातील तालुका समादेशक अधिकारी विजय रामा जावरे यांच्या मार्गदर्शना खाली होमगार्ड पथकाने शहरातील मुख्य रस्त्यावर एस.एस. खान चौक,महाजनगल्ली,म्हसोबा चौक,मेनरोड,पोलीस कवायत मैदान परेड पथ संचलन तसेच पोलीस कार्यालय मैदान तसेच पोलीस स्टेशन या ठिकाणी स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली,यासाठी तालुका समदक्षिक अधिकारी विजय जावरे, वरिष्ठ पलटण नायक पंकज फिरके, कंपनी सर्जन मेजर ज्योति बारी, भगवान पाटील,संतोष बारी,टेकचंद फेगडे,अर्चना कोळी, संगीता पाटील,निशा कदम,सोनल कोळी,प्रवीण तेली,रउफ खान व पुरुष व महिला होमगार्ड कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. व आपला होमगार्ड वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात