आमदार अमोलदादा तुम्ही भुसावळ मार्गे यावल येऊन बघा , तुम्हाला अधिकाऱ्यांचे डोळे लवकरच तपासावे लागतील.


यावल दि.६
रावेर विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार अमोलदादा जावळे तुम्ही एक वेळा भुसावळ मार्गे अंजाळे,निमगाव यावल मार्गे सर्वसामान्य चार चाकी किंवा दुचाकी वाहनाने प्रवास करून बघा तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यांचे डोळे तपासावे लागतील कारण त्यांची दृष्टी,नजर कमी झाल्याने त्यांना त्यांच्या कर्तव्याच्या लेन्स टाकून चष्मा लावण्याच्या सूचना द्याव्या लागतील.
         भुसावळ कडून यावलकडे आल्यास गेल्या वर्षापूर्वी या रोडवर सिमेंट काँक्रीटचे निकृष्ट असे काम झाले रस्त्याच्या बाजूला साईट पट्ट्यां बांधकाम झाले नाही. सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम ज्या ठिकाणाहून सुरू झाले आणि संपले त्या ठिकाणी व्यवस्थित समान रस्ता न केल्याने,तसेच इतर अनेक ठिकाणी रस्त्यावरील खड्ड्यांची तात्पुरती डाग-डुजी सुद्धा बोगस निकृष्ट केली,निमगाव गावाजवळ जिल्हा परिषद शाळेजवळ आणि पुलाजवळ, यावल शहराजवळ सिमेंट काँक्रीट रस्ता निकृष्ट बोगस झाला त्या ठिकाणी यावल शहराजवळ वळणावर आणि राजस्थान ढाब्याजवळ रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे आणि या रस्त्यावरूनच सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी यांचे येणे जाणे सुरू असताना मात्र त्यांना दिसून येत नसल्याने पर्यायी या रस्त्यावर अनेक वेळा अपघात होत आहेत, अनेकांचे जीव गेले आहेत तरी सुद्धा या अधिकाऱ्यांना या रस्त्याची दयनीय अवस्था दिसून येत नसल्याने शासकीय विविध योजनांच्या माध्यमातून त्यांच्या डोळ्यांची तपासणी करावी अशी चर्चा आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात