यावल दि.४
आज बुधवार दि. ४ डिसेंबर २०२४ रोजी यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल मधे शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शन आयोजीत करण्यात आले.
विज्ञान प्रदर्शन कार्यक्रम प्राचार्या रंजना महाजन मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरस्वती विद्या मंदीर शाळेचे मुख्याध्यापक जी.डी.कुलकर्णी सर व यावल तालुका विज्ञान समन्वयक डॉ.नरेंद महाले सर परीक्षक म्हणून उपस्थित होते.या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजनाने तसेच प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे वैज्ञानिक उपकरणांची मांडणी करून त्यांची कार्य पद्धतीचे स्पष्टीकरण केले. कार्यक्रम यशस्वीपणे होण्यासाठी विज्ञान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका प्रेरणा भंगाळे यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता शाळेतील पर्यवेक्षिका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. अशा पद्धतीने विज्ञान प्रदर्शन यशस्वीरित्या उत्साहात पार पडले.
टिप्पणी पोस्ट करा