यावल दि.४
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खास उपस्थितीत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ उद्या दि.५ डिसेंबर २०२४ रोजी देवेंद्र फडणवीस घेणार असल्याने यावल शहरासह संपूर्ण रावेर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी,महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिश बाजी करीत मोठा जल्लोष केला.
जल्लोष साजरा करताना यावल रावेर तालुका आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे,किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष नारायण बापू तालुकाध्यक्ष उमेश फेगडे,बाळू उर्फ हेमराज हेगडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे राकेश फेगडे,पुंडलिक बारी,अरुण पाटील,बबलू घारू,पी.एस.सोनवणे सर,सागर चौधरी,पाचपांडे,उमेश पाटील,मुकेश कोळी,वेंकटेश बारी,किशोर कुलकर्णी,विशाल शिर्के,युवा मोर्चा शहराध्यक्ष मनोज बारी,तेजस पाटील,दीपक चौधरी पराग सराफ इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा