बोदवड येथे जळगाव जिल्हा महा ई सेवा केंद्र चालकांची बैठक संपन्न. रावेर येथे १९ जानेवारी २०२५ ला महत्वाची बैठक.

यावल दि.३०
जळगाव जिल्हा महा ई सेवा केंद्र चालक संघटनेची सर्व साधारण सभा नुकतीच बोदवड येथे जिल्हाध्यक्ष अमोल पठार यांचे अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी युवराज तायडे हे उपस्थित होते. तसेच यापुढील बैठक रावेर येथे १९ जानेवारी २०२५ ला निश्चित करण्यात आली आहे.

जळगांव जिल्ह्यातील महा ई सेवा केंद्र चालकांच्या विविध समस्या शासन दरबारी कशा पद्धतीने मांडायच्या तसेच शासनाचे धोरण आज महा ई सेवा चालकांच्या मुळावर उठल्याने त्यासाठी धोरणात्मक दृष्ट्या आपण आपल्या संघटनेने कशी पावले उचलावी यासाठी राज्य संघटनेचे पदाधिकारी अमोल पढार तसेच जळगांव जिल्हा संघटनेचे अध्यक्ष युवराज तायडे यांनी आज बोदवड येथे झालेल्या सभेत मार्गदर्शन केले तसेच जिल्हाभरात अनधिकृत चालणारे सेवा केंद्र,आधार बाबत येणाऱ्या अडचणी,संघटना मजबूत करून शासन दरबारी आपल्या संघटनेचा आवाज बुलंद करण्यासाठी रणनीती आखण्यात आली व संघटनेची पुढील बैठक दि १९ जानेवारी रोजी रावेर येथे घेण्याचे ठरले.

यावेळी जिल्हाभरातील महा ई सेवा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी बोदवड तालुक्यातील केंद्र चालकांनी उत्तम अशा ठिकाणी सुंदर नियोजन केले होते जिल्ह्यातील सर्वांनी त्यांचे कौतुक केले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात