ग्राहक संरक्षण अधिनियमाची जनजागृती नसल्याने ग्राहक आपल्या अधिकारापासून वंचित.

यावल दि.२४ 
जळगाव जिल्ह्यासह यावल तालुक्यात ग्राहक संरक्षण अधिनियम - २०१९ अंतर्गत २४ डिसेंबर २०२४ हा राष्ट्रीय ग्राहक दिन आज मंगळवारी २४ डिसेंबर २०२४ रोजी कोणताही वाजा गाजा आणि प्रसिद्धी न करता साजरा केला जात आहे परंतु याबाबत शासन स्तरावरून जनजागृती होत नसल्याने ग्राहक आजही आपल्या हक्कांपासून लांब असल्याचे प्रत्यक्ष शासकीय योजनांच्या माध्यमातून दिसून येत आहे.
         शासकीय स्तरावर स्वस्त धान्य दुकान,सुविधा केंद्र,आधार कार्ड नोंदणी,अपडेट व नूतनीकरणासाठी,शेती खरेदी विक्री करताना,मंडळ अधिकारी,तलाठी, भूमी अभिलेख कार्यालयामार्फत नियुक्त केंद्रांमार्फत शहरी व ग्रामीण भागातील शेती,बिनशेती प्लॉट, मोकळ्या जागा,बांधकाम केलेली घरे,इमारतीची खरेदी - विक्री झाल्यानंतर किंवा वारसांची नावे लावण्यासाठी,आणि इतर योजनांसाठी अधिकृतरित्या ठिकठिकाणी शासनमान्य केंद्र आहेत या अनेक केंद्रातून ग्राहकांना सेवा देताना सुविधा केंद्र चालक जी फी घेतात त्या " फि" ची पावती / कॅश मेमो ग्राहकांना देतात का..? तसेच इतर सर्व व्यवहारांमध्ये आर्थिक रक्कम पैसे देताना संबंधित ग्राहकांना पावती देतात का..? सोने-चांदीचे दागिने वस्तू घेताना,मोडतोड करताना संबंधित काही व्यापारी काही ग्राहकांकडून लाखो रुपयांची रोख रक्कम स्वीकारत असून त्यांना त्याच वेळेला त्यांची स्वाक्षरी घेऊन कॅश मेमो देतात का..? मोठमोठ्या रोख रकमा काही व्यापारी स्वीकारतात कशी..? याची तपासणी कारवाई केव्हा आणि कोणाकडून कशी केली जाते..? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असले तरी शासन याबाबतीत जनजागृतीसाठी काय काय प्रयत्न करीत आहे आणि ग्राहक दिन साजरा होताना ग्राहकांना माहिती होण्यासाठी काय काय प्रसिद्धी केली याबाबत सुद्धा चर्चा सुरू आहे.
         ग्राहकांना वस्तू अथवा सेवा यासंबंधी माहिती घेण्याचा हक्क, ग्राहकांची बाजू ऐकून घेतली जाण्याचा हक्क,तक्रार निवारण्याचा हक्क वस्तू निवड करण्याचा हक्क, सुरक्षिततेचा हक्क,ग्राहक जागृतीचा हक्क, आणि ग्राहक दिन साजरा होत असल्याचा माहिती घेण्याचा हक्क याबाबत शासन स्तरावर काय काय प्रयत्न केले गेले याची लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यायला पाहिजे सुज्ञ ग्राहक व नागरिकांमध्ये चर्चा आहे.
          शासनातर्फे २४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जात असला तरी राष्ट्रीय ग्राहक दिनात समाजसेवक,पदाधिकारी,कार्यकर्ते प्रतिनिधींना,ग्राहकांना महत्त्व न देता शासन आपल्या सोयीनुसार राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करून घेत आहेत याकडे नवनियुक्त लोकप्रतिनिधींनी आपले लक्ष केंद्रित करायला पाहिजे अशी अपेक्षा ग्राहकांनी, सज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात