कै.रणछोड वाणी यांच्या स्मरणार्थ यावल येथील घरगुती,गरजू रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मोफत सुविधा. सामाजिक हिताचा स्तुत्य उपक्रम.


यावल दि.१८ 
यावल येथील कै.रणछोड हरिभाऊ वाणी यावल यांचे स्मरणार्थ यावल येथील माजी नगरसेवक सौ.कल्पना दिलीप वाणी व दिलीप वाणी तसेच राजेश श्रावगी व पूजा श्रावगी यांच्या दिपराज परिवारा तर्फे  "रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा " या उद्देशाने आज बुधवार दि.१८ डिसेंबर २९२४ रोजी मोफत घरगुती रुग्णांना वापरण्यासाठी मेडिकल बेड व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे यावल शहरासाठी मान्यवर व मित्र परिवार यांच्या उपस्थितीत  लोकार्पण करण्यात आले.

या लोकार्पण कार्यक्रमात डॉ.धीरज पाटील,पी.एस.सोनवणे सर, दिलीप वाणी,संजय गडे,संजय कवडीवाले.अरुण गडे,पंकज गडे सर,मनोज करणकर,किरण वाणी सर,मंदार गडे,चित्तरंजन गर्गे, राजेश श्रावगी,योगेश वाणी,राजू बारी,अनिश बेहेडे,शुभम गडे, स्वप्निल चव्हाण,आयुष्य वाणी व मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी पी.एस.सोनवणे सर यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त करून गरजू घरगुती रुग्णांना मोफत सुविधा उपलब्ध होणार असल्याने दिपराज परिवाराचे नागरिकांतर्फे आभार मानले व रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा या उपक्रमाचे कौतुक केले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात