महाराष्ट्र ग्रामीण बँक " सातगाव " शाखा व्यवस्थापकपदी मयूर पवार यांना पदोन्नती.


यावल दि.१७ 
यावल येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील उपव्यवस्थापक मयूर पवार यांची पाचोरा तालुक्यात सातगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक व्यवस्थापक म्हणून पदोन्नती झाल्याने त्यांचा यावल नगरपरिषद माजी नगराध्यक्ष राकेश कोलते यांच्यासह बँकेच्या अनेक ग्राहकांनी त्यांना शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. 
         मयूर पवार यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमात प्रामुख्याने त्यांचा सत्कार करताना माजी नगराध्यक्ष राकेश कोलते समाजसेवक धीरज महाजन,गणेश महाजन,अरुण लोखंडे,प्रकाश पारधे,हाजी फारुख साहब,शाखा व्यवस्थापक एस.एस.काकडे साहेब,व बँक अधिकारी विक्रम धकाते,चेतन राजपूत,जानवी दोढे,महेश खाचणे,भूषण महाजन, अश्विनी कोळी यांच्यासह बँकेचे अनेक अनेक ग्राहक उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात