रावेर विधानसभा मतदारसंघात सहकारी संस्थांकडून आचारसंहितेचा भंग : अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष.


यावल दि.११ 
रावेर विधानसभा मतदारसंघात ठीक ठिकाणी सहकारी संस्थांची कार्यालय आहेत या कार्यालयात निवडणूक कार्यक्रमात व्यस्त असलेले अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते बिनधास्तपणे, आमचे कोणी काहीच वाकडे करू शकत नाही असे म्हणत संस्था कार्यालयात ठाण म्हणून चहा पाण्याचा खर्च करीत आचारसंहितेचा भंग करीत असल्याने या सर्रासपणे सुरू असलेल्या कृत्याकडे शासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे संपूर्ण रावेर विधानसभा मतदारसंघात बोलले जात आहे. तरी आचारसंहिता विभाग संबंधित अधिकाऱ्यांनी अचानकपणे काही सहकारी संस्थांच्या कार्यालयांना भेती देऊन ज्या संस्थांमध्ये आचारसंहितेचा भंग होत आहे त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी राजकारणातून मागणी होत आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात