यावल दि.२६
तालुक्यातील मोहराळा येथील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत आज मंगळवार
दि.२६ नोव्हेंबर २०२४ रोजी संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी सामूहिकरित्या भारताची संविधान उद्देशिका याचे वाचन केले कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी माध्यमिक मुख्याध्यापक सागर पवार सर हे होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण तायडे सरांनी केले,संविधानाबाबत विद्यार्थ्यांना माहिती राहुल जावळे सरांनी दिली.त्यात संविधानाची मूल्ये व तत्वे यावर मार्गदर्शन केले,विद्यार्थ्यांना संविधानाच्या प्रती वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या, मोहराळा गावातून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली.कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा