यावल दि.२८ येथील तिरुपतीनगर मधील रहिवासी मुख्याध्यापक संजय अलोने सर यांची मुलगी डॉ.महिमा संजय अलोने हिने अकोला येथील डॉ.आर.आर.के.दंत महाविदयालयात प्राविण्यासह उत्तीर्ण होऊन बीडीएस मध्ये यश संपादन केले,त्या निमित्त यावल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राकेश कोलते,गणेश महाजन,रमेश जोगी,हाजी फारूक शेख,भरत कोळी,चंद्रकांत बारी,व आजोबा लोटन बडगुजर यांनी पेढे भरवून पुष्प गुच्छ देऊन अभिष्टचिंतन केले,डॉ.महिमा अलोने यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा