यावल दि.२
तालुक्यातील सातोद येथील प्रगतशील शेतकरी प्रेमचंद दिगंबर कुरकुरे यांना राज्यस्तरीय कृषीभूषण पुरस्कार नुकताच मिळाला.
सातोद येथील सहजानंद ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे संस्थापक तथा सेवानिवृत्त पोलीस पाटील आणि प्रगतशील शेतकरी प्रेमचंद दिगंबर कुरकुरे यांचे सामाजिक,कृषी,विषयक आणि जनजागृती व इतर क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा आढावा घेऊन जळगाव येथील राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेने प्रेमचंद कुरकुरे यांना राज्यस्तरीय कृषीभूषण पुरस्कार नुकताच जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अल्पबचन भवनात आयोजित पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते तसेच सौ.संदीपा वाघ यांच्या उपस्थितीत दिला.
टिप्पणी पोस्ट करा