यावल दि.२६
पावसाळा जवळ जवळ संपण्याच्या मार्गावर आहे आता सकाळी सकाळी " धुक्याचे " प्रमाण वाढत असले तरी रावेर विधानसभा मतदारसंघात सुद्धा आमदारकीचे चित्र स्पष्ट होत असल्याचे विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना दिसून येत आहे.
रावेर विधानसभा मतदारसंघात जवळजवळ चार प्रमुख ( अपक्ष यांच्यासह ) राजकीय पक्षांचे उमेदवार निश्चित झाले आहेत अजून काही उमेदवार रावेर विधानसभा निवडणूक रिंगणात येतील.निवडणूक रिंगणात असलेल्या प्रमुख एकूण १ ते ३ उमेदवारांपैकी त्यांच्या समर्थकांची गर्दी,उत्साह,बघितला असता या गर्दीचा लाभ नेमका कोणाला होणार..? आणि कोण कोणत्या राजकीय पक्षाचे मतदान आपल्याकडे ओढणार..! आणि कोणाचा विजय होणार..? याकडे रावेर विधानसभा मतदारसंघ मतदारांनी,नागरिकांनी काल शुक्रवार दि.२५ ऑक्टोबर २०२४ या शुभ दिवशी प्राथमिक अंदाज काढला आहे.
फैजपूर मार्गे रावेर विधानसभा मतदारसंघात महागड्या गाडीत बसणाऱ्यांना आता पुन्हा भालोद मार्गे फैजपूरहून रावेर विधानसभा मतदारसंघात पुढील ५ वर्ष "कमळ" चिन्हाचा वापर करून ' जा ' ' ये ' करावी लागणार असल्याचे काल रावेर मधील गर्दीमुळे स्पष्ट झाले आहे.आणि २० नोव्हेंबर २०२४ नंतर कोण विजयी होणार याबाबत सुद्धा राजकीय चित्र स्पष्ट होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा