यावल दि.२१
जळगाव जिल्ह्यातील ८४ महसूल मंडळांना फळपीक विमाचा लाभ मिळणार असल्याचे नुकतेच शेतकऱ्यांना समजले परंतु यावल तालुक्यात फक्त यावल मंडळ वगळल्याने,तसेच यावल शहरातील शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीच्या यंत्रणेला ठरलेली बेकायदा वर्गणी न दिल्याने,यावल मंडळ फळपीक विम्यापासून जाणून बुजून वगळण्यात आले का..? याबाबत यावल मंडळातील सर्व शेतकरी बांधव आज दुपारी यावल तालुका शेतकरी सहकारी संघात एकत्रित येऊन सामुदायिक रित्या तीव्र संताप व्यक्त केला आणि याबाबत आज मंगळवार दि.२२ रोजी खासदार रक्षाताई खडसे यांची भेट घेऊन त्यांना यावल मंडळाचा फळपीक विमा मंजूर का झाला नाही..? याबाबत जाब विचारणार असल्याचे शेतकऱ्यांमध्ये चर्चेअंती निश्चित करण्यात आले.
जिल्हाधिकारी जळगाव यांनी २२ मे २०२४ रोजी जळगाव जिल्ह्यातील उष्माघाताबाबत / तीव्र उष्ण तापमानाबाबत एक परिपत्रक काढून उपाय योजना करण्याबाबत संबंधित शासकीय यंत्रणेला तथा अधिकाऱ्यांना कळविले होते आणि आहे.
जळगाव जिल्ह्यात भुसावळ,बोदवड,चोपडा,जामनेर,
मुक्ताईनगर,रावेर,खिरोदा प्र.यावल,सावदा,अमळनेर,
भडगाव चाळीसगाव, धरणगाव,एरंडोल,जळगाव,
पाचोरा,पारोळा इत्यादी ठिकाणच्या महसूल मंडळात फळपीक विम्याचा लाभ मिळणार आहे मग यावल महसूल मंडळात सन २०२४ मध्ये उष्ण तापमान नव्हते का..? यावल महसूल मंडळात थंड तापमान असल्याची नोंद झाली आहे का...? तसेच यावल मंडळातील शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीच्या संबंधित यंत्रणेला म्हणजे प्रतिनिधीला सामुदायिक रित्या प्रत्येकी हेक्टरी तीन ते पाच हजार रुपयाची वर्गणी जमा करून न दिल्याने,तसेच लोकसभा निवडणूक आधी उमेदवारी निश्चित करताना पक्षांतर्गत काही पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या वादामुळे यावल महसूल मंडळ जाणून-बुजून वगळण्यात आले आहे का..? इत्यादी अनेक प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी तसेच यावल मंडळातील शेतकऱ्यांना फळपीक विमाचा लाभ मिळण्यासाठी दि.२२ ऑक्टोबर २०२४ रोजी रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांची भेट घेणार आहेत.असे यावल मंडळातील शेतकऱ्यांनी सामुदायिक रित्या आज झालेल्या बैठकीत निश्चित केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा