यावल येथील सरदार वल्लभभाई पटेल स्कूल मध्ये लालबहादूर शास्त्री,महात्मा गांधी यांची जयंती साजरी.


यावल दि.२ 
आज २ ऑक्टोबर २०२४ रोजी यावल येथील मनुदेवी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल मिडीयम स्कूल मध्ये पूर्व पंतप्रधान मंत्री लालबहादूर शास्त्री व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
   सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आज सकाळी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व पूर्व पंतप्रधान मंत्री लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शिला तायडे मॅडम यांच्या हस्ते महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी स्कूलचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र महाजन सर व संस्थेचे संचालक शशीकांत फेगडे,
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शीला तायडे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत तुमच्या उत्साहात कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.प्रवीणा पाचपांडे मॅडम यांनी केले.या कार्यक्रमास प्रशांत फेगडे सर यांच्यासह शाळेतील शिक्षक वृंद व 
कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात