यावल दि.१२
आज विजयादशमीच्या दिवशी यावल येथील लहान मारोती देशमुखवाडा जवळील तेजस्विनी दुर्गोत्सव मंडळातर्फे मुलींनी उत्कृष्ट आकर्षक रांगोळी काढून उद्योगपती स्वर्गवासी रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
सदर रांगोळी ही वैष्णवी भोसले,अश्विनी ढाके,तेजस्विनी सोनार, मोहिनी भोसले,दिव्या भोसले,भाग्यश्री सोनार,लावण्या भोसले,नेहा भोसले यांनी साकारली.सदर रांगोळीची संकल्पना मंडळाचे अध्यक्ष किशोर माळी यांनी मांडली.तसेच श्रध्दांजली अर्पण कार्यक्रमास किशोर माळी,दत्तू पाटील,
घनश्याम पाटील,दिनेश माळी,प्रकाश भोसले,यशवंत भोईटे,पंकज माळी, स्नेहल फिरके,बाळू सोनार,
नितीन माळी,गुड्डू माळी,वैभव माळी,निलेश माळी,वाल्मीक भोसले,संजय फिरके,यांच्यासह
अनेक महिला उपस्थित होत्या.देशमुख वाडा,
बोरावलगेट परिसरासह संपूर्ण यावल शहरातून श्रद्धांजलीयुक्त उत्कृष्ट रांगोळी पाहण्यासाठी अनेकांनी उपस्थिती देऊन रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली.
टिप्पणी पोस्ट करा