यावल तालुक्यात महेलखेडी गावात विजयादशमीनिमित्त एसटीबसचे पूजन. १७ १७ वर्षाची अखंड परंपरा आहे.

यावल दि.१२
तालुक्यातील महेलखेडी गावात विजयादशमी निमित्त एसटीबसची उत्कृष्ट लक्षवेधी सजावट करून पूजन करण्यात आले.ग्रामस्थ आणि राज्य परिवहन महामंडळातील यावल आगारातील संबंधित त्यादिवशी ड्युटीवर / असलेल्या वाहन चालकांची कौतुकास्पद प्रेरणादायी प्रथा गेल्या १७ वर्षांपासून सुरू आहे.

महेलखेडी या गावात यावल एसटी आगारातील बसचे विजयादशमी निम्मित पूजन करण्यात आले दरवर्षी प्रमाणे महेलखेडी गावात चालक व वाहक, ग्रामस्थ यांच्या वतीने हा कार्यक्रम राबवला जातो यंदाही बस पूजनाचा मान चालक सुनील महाजन व छाया महाजन यांचा मुलगा भावेश महाजन यांची पत्नी भाग्यश्री महाजन मोठा मुलगा काशिनाथ महाजन यांची पत्नी सपना महाजन व वाहक तुषार कपले व सोनल कपले यांचा मुलगा लक्षित पूनित या दाम्पत्याला मिळाला यांच्या हस्ते यावल हरिपुरा या बसचे पूजन करण्यात आले या वेळी चालक आर.एम.शेख व वाहक अकील तडवी उपस्थित होते.महेलखेडी गावातील महाजन परिवार ग्रामस्थांना विश्वासात घेऊन आणि सहकार्याने गेल्या १७ वर्षापासून हा कार्यक्रम राबवत आहे.या प्रसंगी लोकेश येवले, ललित कपले प्रवीण कपले.ललित पाटील.प्रमोद महाजन.नामदेव झुरकाळे.कपिल झुरकाले.गुंजन महाजन.विक्रम पाटील.अशोक तायडे विक्रम पाटील व महेलखेडी ग्रामस्थ उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात