यावल दि. ९
दि.३ ऑक्टोंबर २०२४ पासुन यावल पंचायत समिती समोर अनु . जाती / जमातीच्या लोकांना न्याय मिळवण्या करिता संघटनेच्या वतिने आंदोलन सुरू करण्यात आले परंतु पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून उडावाउडवी चे उत्तर मिळाल्यामुळे ठिय्या आंदोलनाचे रुपांतर आमरण उपोषणात दि .०५ ऑक्टोंबर २०२४ पासुन संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष यांनी सुरु केले होते. आमरण उपोषण तात्काळ मिटावे यासाठी यावल तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांचे सुरुवातीपासून प्रयत्न सुरू होते अखेर त्यांच्या प्रयत्नांना आज संध्याकाळी यश मिळून उपोषणाची सांगता करण्यात आली.
आमरण उपोषण प्रामुख्याने भालशिव ग्रामपंचायत अंतर्गत टेंभीकुरण गाव ते पाटसरी रस्त्याचे काम तात्काळ करून घेण्याचे यावल तहसिलदार श्रीमती मोहनमाला नाझीरकर यांनी आश्वासन दिले.तसेच टेभीकुरण गावातील अनु - जाती जमातीच्या लोकांच्या मुलभुत सुविधा व झालेल्या अन्यायाच्या संदर्भात चौकशी कामी त्रीसदस्य समिती गठीत करून चौकशी करण्याचे आदेश जिल्हापरिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी लेखी पत्र संघटनेला यावल तहसिलदार मोहनमाला नाझरिकर यांच्या हस्ते दिले.त्या प्रसंगी यावल पो.स्टे.पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर व सहा गटविकास अधिकारी उपस्थित होते.उपोषण सोडतांना संघटेनेचे संस्थापका / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांनी सांगीतले की ही लढाई कुठल्याही मुलभूत सुविधा करीता नसून दलीत आदिवासी समाज्याच्या हक्काची आणि मान- सन्मानाची होती.तरी या आंदोलनाच्या यशस्वीते करिता इकबाल तडवी,अनिल इंधाटे , विलास तायडे,सागर तायडे,अनिल तायडे,डोमा सोनवणे,
मिलिंद सोनवणे,जंगलू बारेला यांनी व इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा