यावल दि.२६
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरीत होऊन तसेच मनसेचे नेते ॲड.जयप्रकाश बाविस्कर यांच्या अमोल दर्शनामुळे आणि मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संजय नन्नवरे यांच्या ५० व्या वाढदिवसाचे निमित्त साधत पाडळसे गावातील एकूण ५० कट्टर कार्यकर्त्यांनी २ दिवसांपूर्वी मनसेमध्ये स्वयंस्फूर्तीने प्रवेश करून तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांची भक्कम फळी निर्माण करण्याचा संकल्प केला.
तालुक्यातील पाडळसे येथील या भव्य पक्ष प्रवेश कार्यक्रमात उपस्थित मार्गदर्शक ॲड.जमीलभाई देशपांडे,भुसावळ उप जिल्हाध्यक्ष विनोद पाठक,
जळगाव महानगर अध्यक्ष किरणभाऊ तळेले,
उपाध्यक्ष सतिष सैंदाणे आणी यावल शहराध्यक्ष अजय तायडे व (पाडळसा,भालोद गटाचे ) यावल ता.उपाध्यक्ष पंकज तावडे युवराजभाऊ कोळी,दिलीप तावडे, ज्ञानेश्वर कोळी,देवा कोळी,संदिप लोहार,
योगेश ठाकरे,किरण भोई ,आकाश कोळी,सागर कोळी आणी समस्त जेष्ठ व तरुण, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजय नन्नवरे हे उत्कृष्ट आणि यशस्वी मूर्तिकार आहेत. त्यांना त्यांच्या ५० वर्षाच्या उभ्या आयुष्यात वाढदिवसाची अशी आगळीवेगळी भेट पाडळसा येथील तरुणांनी दिली म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत असल्याचा गर्व आहे असे संजय नन्नवरे यांनी म्हटले आहे.खेड्यापाड्यात गाव कुशीवर माननीय राज साहेब ठाकरे यांची चर्चा असल्याचे चित्र या लहानशा गावात आढळले. याप्रसंगी मनुष्याचे भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे उपजिल्हाध्यक्ष विनोद पाठक, जळगाव शहराचे महानगराध्यक्ष किरण तळले, उप महानगराध्यक्ष सतीश सैंदाणे, यावलचे शहराध्यक्ष अजय तायडे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा