यावल दि.२६
मंगळवार दि.२४ सप्टेंबर २०२४ येथील रोजी सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या विज्ञान विषयात असलेल्या अभ्यास क्रमातील घटकात उल्लेख आलेल्या पद्मश्री पुरस्कार प्राप्त जादव मोलाई पऍंग यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन विज्ञान विषयाच्या पर्यावरण जतन व संवर्धन या प्रकल्पा अंतर्गत इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांनी गटागटाने वृक्षरोपण करून त्या वृक्षाला दत्तक घेऊन त्याचे संवर्धन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आज पासून मुख्याध्यापक जी.डी.कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्परुपी उपक्रमाला सुरुवात केली.
राजेंद्रप्रसाद शास्त्री,नारायण भट शास्त्री,मोहन प्रसाद शास्त्री यांच्या उपस्थितीत स्वामींनारायण मंदिर येथील परिसरात प्रथम आज ५ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. १५ दिवस वृक्षारोपण सुरू राहणार आहे.जवळ जवळ ५० ते ६० झाडे रोपण करून संवर्धनाचा निश्चय विद्यार्थ्यांनी केलेला आहे.या सर्व प्रकल्पाला वेळोवेळी विज्ञान विभागाचे ए.एस.सूर्यवंशी,डॉ.नरेंद्र महाले,एस.डी.चौधरी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या उपक्रमासाठी सरस्वती विद्या मंदिरातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभत आहे.यात खुशाल सपकाळे, नयन पाटील,विकी भोई,जीवन देशमुखे,शुभम ढाके,दर्शन चौधरी,निशांत चौधरी,प्रितेश
सोनवणे,जयेश बारी,संचित कोळी महाराज यांनी मेहनत घेतली.
टिप्पणी पोस्ट करा