यावल दि.३०
किशोर देवराम राणे यांना जळगाव येथील राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे शनिवार दि.२८ सप्टेंबर २०२४ रोजी राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कार देण्यात आला त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.
यावल येथील प्रगतशील,प्रयोगशील आणि केळी निर्यातदार असलेले शेतकरी किशोर देवराम राणे यांनी त्यांचे वडिल तथा माजी नगरसेवक आणि लोकेश केळी ग्रुपचे संचालक देवराम कृष्णा राणे यांच्याकडून उत्कृष्ट शेती कशी करायची याबाबतचे धडे घेतले आहेत आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत शेतीत एकनिष्ठेने रात्रंदिवस काबाड कष्ट करून शेती व्यवसायात उत्तम प्रगती केली.
याची दखल जळगाव येथील राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेने घेतली असून संस्थापक अध्यक्षा संदीपा वाघ यांच्या उपस्थितीत व मान्यवरांच्या हस्ते त्यांना राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कार देऊन भरगच्च अशा पुरस्कार वितरण सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.
त्यांना राज्यस्तरीय कृषिभूषण पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.कृषी भूषण पुरस्कार व सन्मान चिन्ह मिळाल्याने ओंकार राणे यांना शेतीत काम करण्याची ऊर्जा आणि अत्याधुनिक शेती करण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा