बाल संस्कार विद्या मंदिरातील विद्यार्थी,पालक व शिक्षकांची मोफत आरोग्य तपासणी.


यावल दि.२६ 
आज गुरुवार दि.२६ सप्टेंबर २०२४ रोजी येथील बाल संस्कार मंडळ एज्युकेशन सोसायटी संचलित बाल संस्कार विद्या मंदिरत राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष उपमुख्यमंत्री व महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजना शाखा जळगाव यांच्या समन्वयाने मोफत सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.यात बाल संस्कार विद्या मंदिरातील विद्यार्थी पालकांसह शिक्षकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
       शाळेतील ७५० विद्यार्थी तसेच पालक व शिक्षक यांचे मोफत आरोग्य तसेच रक्त तपासणी  करण्यात झाली.सदर कार्यक्रमात तपासणी करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ.गौरव महाजन,डॉ.वरून सरोदे,
डॉ.एजाज डॉ.वृषाली सरोदे,डॉ.विठ्ठल बागुल,
डॉ.संगीता पाटील,डॉ.सुनील पाटील,डॉ.उमेश कवडीवाले,डॉ.जीवन यावलकर,समुपदेशक 
वसंतकुमार सदांशिव, पवन जगताप,रवींद्र माळी यांचे हस्ते करण्यात आले.तसेच वैद्यकीय सल्ला देण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष महेश वाणी,सहसचिव संतोष कवडीवाले,उपाध्यक्ष तेजस यावलकर,कार्यकारणी सदस्य रवींद्र भार्गव,प्रशांत श्रावगी यांचे मार्गदर्शनाने आणि शाळेचे मुख्याध्यापक सुनील माळी,अतुल गर्गे यांच्या नियोजनानुसार घेण्यात आला वरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.शाळेतील सर्व विद्यार्थी पालक व शिक्षक यांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला व सदर कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात