यावल दि.१७
जिल्हाधिकारी जळगाव तथा जिल्हा दंडाधिकारी आयुष प्रसाद यांनी बुधवार दि.१८ सप्टेंबर २०२४ रोजी संपूर्ण जिल्ह्यात सार्वजनिक सुटी लेखी आदेशान्वये जाहीर केली होती आणि आहे,परंतु यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाने आणि सचिव स्वप्निल सोनवणे यांनी आपल्या सोयीनुसार दि.१८ ची सुट्टी आज मंगळवार दि.१७ रोजी मुख्य कार्यालय बंद ठेवून सुट्टी घेतली. तसेच उद्या बुधवार दि.१८ रोजी यावल कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या बैठकीत सभापतीची निवड होणार असल्याने याबाबत शिवसेना विभाग प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवीण लोणारी यांनी अनेक प्रश्न उपस्थित करून कृषी उत्पन्न बाजार समितीने जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशाची पायमल्ली केली आहे किंवा नाही..? याबाबतची चौकशी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव,जिल्हाधिकारी जळगाव यांनी करायला पाहिजे अशी मागणी केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे यावल येथील मुख्य कार्यालय आज मंगळवार दि.१७ रोजी संपूर्ण दिवस बंद होते.उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना विभाग प्रमुख प्रवीण लोणारी हे आज काही कामानिमित्त बाजार समिती कार्यालयात गेले असता त्यांनी बाजार समितीचे कार्यालय बंद असल्याची माहिती व्हिडिओ चित्रण व छायाचित्रासह दिली. बाजार समितीने आज सुट्टी कोणत्या नियमानुसार आणि कोणाच्या आदेशान्वये आणि कोणत्या अधिकाराने घेतली तसेच जळगाव जिल्ह्यात उद्या दि.१८ रोजी सार्वजनिक सुटी जाहीर केलेली असताना यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव तथा संबंधित अधिकाऱ्यांनी उद्या दि.१८ रोजी बाजार समिती संचालकांची बैठक आयोजित करून सभापती पदाची निवड ठेवल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याचप्रमाणे बाजार समिती सभापती पदाची निवड निश्चित असली तरी याबाबत यावल कृषी उत्पन्न बाजार समितीने गोपनीयता बाळगून प्रसिद्धी माध्यमांना सुद्धा अंधारात ठेवून सभापती निवड बाबत कोणतीही माहिती दिलेली नाही,सभापती निवड मध्येच कोणत्या कारणाने होत असून आणि सभापती साठी कोण कोण इच्छुक आहेत..? याबाबत यावल तालुक्यातील शेतकरी,व्यापारी, हमाल मापारी यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे.
याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव स्वप्निल सोनवणे यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून माहिती दिली की यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य कार्यालय आज बंद असले तरी बाजार समितीचे इतर संपूर्ण व्यवहार आणि दैनंदिन कार्यालयीन कामकाज सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.तसेच आज सुट्टी घेऊन उद्या दि.१८ रोजी कार्यालयीन कामकाज सुरू राहणार असल्याची सुद्धा माहिती त्यांनी दिली. सभापती निवड बाबत त्यांनी मात्र कोणतीही माहिती दिली नाही.
टिप्पणी पोस्ट करा