यावल दि. ९
आज शुक्रवार दि. ९ रोजी सकाळी यावल येथील सरदार वल्लभभाई पटेल शाळेमध्ये क्रांती दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून दहिगाव येथील आदर्श विद्यालयातील सलीम तडवी सर यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी जागतिक आदिवासी क्रांती दिनाचे महत्त्व आणि माहिती सलीम तडवी सर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना दिली.
सर्वात प्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शीला तायडे मॅडम यांच्या हस्ते सलीम तडवी सर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत व सत्कार केला.तद्नंतर विद्यार्थ्यांनी सुद्धा क्रांती दिनाविषयी माहिती सांगून भाषण केले तसेच सलीम तडवी सर यांनी मुलांना मार्गदर्शनपर भाषण केले. तसेच शाळेचे शिक्षक जुनेद खान सर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अर्चना चौधरी मॅडम यांनी केले.संस्थाध्यक्ष राजेंद्र महाजन सर व सौ . शिला तायडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा कार्यक्रम पार पडला. प्रशांत फेगडे सर यांच्यासह सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वर्गाने कार्यक्रम यशस्वीतेसाठी उत्कृष्ट नियोजन केले होते.
टिप्पणी पोस्ट करा