यावल दि.१५
आज गुरुवार दि.१५ ऑगस्ट २०२४ रोजी यावल येथिल व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.ध्वजारोहण व्यास शिक्षण मंडळाचे संचालक ए.बी.महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
त्याचप्रमाणे स्कूलच्या प्रिन्सिपल रंजना महाजन,ज्ञानेश्वर मावळे सर तसेच प्राचार्य वाघुळदे सर व स्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या प्रसंगी विदयार्थ्यांनी देशभक्तीपर गीते म्हणून स्वातंत्र्य दिनानिमित्त घोषणा देऊन भाषणे सुद्धा सादर केली.स्वतंत्र्यदिनाच्या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांची गावातून भव्य अशी रॅली काढण्यात आली. स्कूल मधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.अशा प्रकारे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला.
टिप्पणी पोस्ट करा