यावल दि.१४ भारतीय डाक विभाग अधीक्षक डाकघर भुसावळ विभाग भुसावळ यांच्या सूचनेनुसार यावल येथे शुक्रवार दि.१६ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत यावल पोस्ट ऑफिस तर्फे " डाक चौपाल" कार्यक्रम आयोजित केला आहे.
डाक विभागातील बचत ठेव, लेक लाडकी योजना, लाडली बहीण योजना, सुकन्या समृद्धी योजना, पुनरावर्ती ठेव खाते, सावधी जमा खाते २ ते ५ वर्षापर्यंत, मासिक आय योजना,लोक भविष्य खाते, ज्येष्ठ नागरिक बचत योजना,राष्ट्रीय बचत पत्र,किसान विकास पत्र,महिला सन्मान बचत पत्र, इत्यादी योजनांची व व्याजाचा दर काय राहील यासंदर्भात आणि डाक जीवन विमा, ग्रामीण डाक जीवन विमा, अटल पेन्शन योजना,प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना,प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना,लोक भविष्य खाते,आधार सेवा ( नवीन नोंदणी व अद्यावतन ), पासपोर्ट सेवा,आयपीपीबी खाते, निर्यात केंद्र इत्यादी सेवा डाक विभागामार्फत ज्या सुरू आहे त्याची सविस्तर माहिती दिली जाणार आहे तरी या " डाक चौपाल " कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त स्त्री-पुरुष नागरिकांनी घ्यावा असे आवाहन अधीक्षक डाकघर भुसावळ विभाग भुसावळ यांच्यासह यावल पोस्ट ऑफिस तर्फे करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा