जळगाव जिल्हा कृषी औद्यागिक सर्व सेवा सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपसभापती तेजस पाटील यांचा सत्कार.

यावल दि.२५
जळगाव जिल्हा कृषी औद्यागिक सर्व सेवा सहकारी संस्था मर्यादित जळगाव यांची वार्षिक सर्वसाधारण सभा आज रविवारी दि.२५ऑगस्ट २०२४ रोजी जळगाव जिल्हा सहकारी बोर्डाच्या हॉल मध्ये संपन्न झाली.या सभेत यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे उपसभापती तेजस धनंजय पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
       या सभेला जिल्हाभरातून सर्व सभासद वर्ग व मान्यवर उपस्थित होते.यावेळी सहकार क्षेत्रात सर्वात कमी वयाचे यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे युवा उपसभापती तेजस धनंजय पाटील यांचा सत्कार जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेचे व्हॉईस चेअरमन संजीव दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष रोहितदादा निकम,संस्थेच्या अध्यक्षा ताईसो शैलजादेवी निकम,संस्थेचे संचालक वाल्मीक मामा पाटील,शांताराम दादा सोनवणे,
डॉ.सतीश दादा देवकर,रामनाथ दादा पाटील, रमेशदादा पाटील,यादवराव दादा पाटील,नानादादा पाटील,सुधाकर दादा पाटील,मंगेशदादा पाटील, वसंतदादा साबळे,नथूदादा पाटील यासह सर्व संचालक मंडळ,संस्थेचे व्यवस्थापक विश्वनाथ दादा पाटील व सर्व कर्मचारी उपस्थित होते.सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संस्थेची वार्षिक सभा आनंदात पार पडली.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात