यावल दि.२८
आज बुधवार दि. २८ ऑगस्ट रोजी यावल येथील व्यास शिक्षण मंडळ सचलित जे.टी.महाजन इंग्लिश मेडिअम स्कुल मध्ये विद्यार्थ्यांचा गोपाळकाला कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रसंगी शाळेच्या प्राचार्य रंजना महाजन मॅडम व प्राचार्य ज्ञानेश्वर मावळे सर यांच्या हस्ते श्रीकृष्ण पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. गोरी भिरूड मॅडम व श्रीमती राजश्री लोखंडे मॅडम उपस्थित होत्या या कार्यक्रमात विदयार्थी राधाकृष्णाच्या वेशभुषेत सर्वांचे लक्ष वेधून घेत होते त्यानंतर शाळेतील नववी व दहावी विद्यार्थ्यांनी गोविंदा बनून दहीहंडी फोडली.अशा उत्साहपूर्ण वातावरणात मुलां मध्ये कार्यक्रम झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अर्चना पाटील मॅडम ने केले श्रीकृष्ण जन्माविषयी सौ.प्रियंका फेगडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली कार्यक्रमात उपस्थितांचे आभार सलेहाखान मॅडम यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा