यावल दि.२७
महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारचे काळे कारनामे कसे झाले..,? आणि सुरू आहेत याबाबतची माहिती जनतेला कळावी म्हणून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस यावल तालुका तर्फे आज यावल येथे भव्य जाहीर कार्यक्रम घेऊन तीव्र निषेध व्यक्त करीत,घोषणा देत राजकीय कार्यक्रमातून जनजागृतीची "दहीहंडी " फोडली.
यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षातर्फे आज मंगळवार दि.२७ ऑगस्ट २०२४ रोजी यावल येथील भुसावळ टी पॉइंट येथे “महायुती सरकारचे काळे कारनामे” कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात वाढत्या महागाईमुळे प्रत्येक कुटुंबाचे कोळमळलेले आर्थिक नियोजन,महाराष्ट्र अस्मितेवरचा घाव,वाढती गुंडगिरी व गुन्हेगारी,मुली व महिलांवर वाढते अन्याय,अत्याचार घटना,वाढता भ्रष्टाचार,पेपर फुटीमुळे ढासळलेल्या शैक्षणिक अवस्थेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान,सुशिक्षित बेकारीची व बेरोजगाराची उद्भवलेली समस्या व सगळ्या गोष्टी महायुतीकडून करण्यात आल्या स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी या नतदृष्ट सरकारने केवळ समाजा- समाजात भांडण लावण्याचे काम केलं महायुती सरकारच्या या काळे कारनाम्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी,
कार्यकर्ते यांनी महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा करून महायुती सरकारची काळे कारनाम्यांची दहीहंडी फोडण्यात आली व “महायुती काळे कारणामे” याचे बारा पानांचे पेपर प्रसिद्ध करण्यात येऊन जनसामान्य जनतेस वाचण्यासाठी पेपरचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले,माजी नगराध्यक्ष अतुल पाटील,विजय पाटील,एम.बी.तडवी सर,भैय्या नरेंद्र पाटील,पवन पाटील ॲड कोमलसिंग पाटील,ललित पाटील,बापू जासूद,नानाजी प्रेमचंद पाटील,अरुण लोखंडे,कामराज घारू,आरिफ तडवी मोहसीन खान, ललित तेली,पितांबर महाजन,ललित पाटील,
किशोर माळी,प्रसन्न पाटील,अय्याज मण्यार,जाहीद कुरेशी,जुनेद शेख,शेख इरफान,विजय साळी,
गजानन पाटील,प्रकाश भोसले,यशवंत पाटील,
आबिद मोमीन इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्ये उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा