जि.प.जळगाव सामान्य प्रशासन विभागातील लाचखोर वरिष्ठ लिपिक नरेंद्र खाचणे १ लाख ८० हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडला गेला. लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांची कारवाई.


यावल दि.२१
जिल्हा परिषद जळगाव कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ लिपिक नरेंद्र किशोर खाचणे वय ५२ यास १ लाख ८० हजार रुपयाची लाच घेताना जळगाव येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्या पथकाने आज बुधवार दि.२१ ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळी रंगेहात पकडल्याने संपूर्ण जळगाव जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात, पंचायत समिती कार्यक्षेत्रात,
आरोग्य विभाग कार्यक्षेत्रात मोठी खळबळ उडाली.
        याबाबत सविस्तर माहिती अशी की,यातील तक्रारदार हे लोकसेवक असुन तक्रारदार यांची सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्र यावल येथे शिपाई पदावर कार्यरत होते.त्यांची स्थापत्य अभियांतीकी सहाय्यक या पदावर रावेर पंचायत समिती येथे बदली झाली होती.बदली ठिकाणी कार्यमुक्तीसाठी यातील तक्रारदार यांचेकडे 2,00,000/- रू.मागणी केली होती त्याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव येथे आज दि.२१ ऑगस्ट २०२४ रोजी तक्रार दिली.सदर तक्रारीची आणि लाच मागणीची पडताळणी केली असता आलोसे यांनी पंचासमक्ष तडजोडअंती १, ८०,०००/- रुपये लाचेची मागणी करून स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.त्यांचे वर शनिपेठ पोलीस स्टेशन, जळगांव येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
        सदरची कारवाई श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक,ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक स्वप्निल राजपूत साो वाचक पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र,नाशिक. यांच्या मार्गदर्शनाखाली
कारवाई मदत पथक-एन.एन.जाधव,पोलीस निरीक्षक,PSI दिनेशसिंग पाटील,सुरेश पाटील,पो.ह.
रविंद्र घुगे,म.पो.हे.कॉ.शैला धनगर,पो.ना. किशोर महाजन,पो.कॉ.प्रदीप पोळ,पो.कॉ.प्रणेश ठाकुर,
पो.कॉ. सचिन चाटे,अमोल सूर्यवंशी यांनी केली.

**************************************

या प्रकरणातील आरोपीच्या छायाचित्रांचा शोध घेतला असता कुठेही आरोपीचे छायाचित्र मिळाले नाही.

***************************************

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात