यावल दि.१२
१५ ऑगस्ट २०२४ दरम्यान रावेर विधानसभा मतदारसंघात म्हणजे संपूर्ण यावल - रावेर तालुक्यात ' घरोघरी तिरंगा ' अभियान यावल येथील डॉ. कुंदन वेगळे यांनी नियोजन पूर्वक अभियान यशस्वीरित्या राबविले.
केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने सर्व राज्यांच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत दूरदृष्टी प्रणाली द्वारे बैठक झाली होती त्यात घरोघरी तिरंगा अभियान राबविण्यात संदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसारआज मंगळवार दि.१३ ऑगस्ट २०२४ रोजी ७८ व्या स्वातंत्र दिना निमित्त दि.९ऑगस्ट ते दि १५ ऑगस्ट देशाच्या स्वातंत्र्य दिना पर्यंत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आवाहन केलेल्या हर घर तिरंगा अभियानांतर्गत रावेर - यावल मतदार संघातील रोझोदा,खिरोदा, सावखेडे बु व कुंभारखेडे येथे तिरंगा वितरण कार्यक्रमास उपस्थित राहुल घरोघरी तिरंगा वाटप करण्यात आला.
ह्यावेळेस प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्यासाठी देशभक्त नागरिकांना आवाहन केले नागरिकांमधे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद दिसून आला.देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन नरेंद्रजी मोदी यांनी ३ वर्षांपूर्वी हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात केली. तेव्हा पासून येणाऱ्या प्रत्येक वर्षी ९ ते १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिना निमित्त सदर अभियान राबवले जात आहे,
भारतीयांमध्ये देशभक्ती,राष्ट्राविषयी कृतज्ञ भाव जागृत करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट्ये आहेत.यावेळी राझोदे ता रावेर येथील उपसरपंच चेतन भारंबे,सदस्य निखिल सोरोदे,हर्षल सोरोदे,भुषण राणे,रोशन धांडे,मनिष लोहार,मोहन मेढे, निपुण धांडे,मानस धांडे,ललित फेगडे, गोवर्धन ढाके,पंकज इंगळे,उमेश इंगळे, नानू माळी,पंकज झोपे,गिरीश झोपे,कुंभारखेडा येथील प्रदीप पाटील,
उपसरपंच माधव चौधरी,शांताराम राणे, पंडित महाजन,हरीश चौधरी,निलेश पाटील,युवराज पाटील,गंगाराम राणे इत्यादी ग्रामस्थांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थिती होते.
टिप्पणी पोस्ट करा