यावल दि.५
यावल ग्रामिण रुग्णालयात तात्काळ कायमस्वरूपी डॉक्टराची नेमणुक करणेबाबत तसेच तालुक्यातील दलित - आदिवासी समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ निळे निशाण संघटनेचा भव्य मोर्चा आज सोमवार दि.५ ऑगस्ट २०२४ रोजी निळे निशाण संघटना संस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. तसेच मागण्यांची पूर्तता तात्काळ न झाल्यास भविष्यात तिव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा सुद्धा देण्यात आला.
यावल नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की ग्रामिण रुग्णालय यावलचे वैद्यकीय अधिक्षक यांनी शासनाची दिशाभुल करण्याच्या उद्देशाने दिलेल्या लेखी पत्राची चौकशी करण्यात यावी,यावल ग्रामिण रुग्णालयात कायम स्वरूपी विविध तज्ञ डॉक्टरांची नेमणुक करण्यात यावी,प्रसुती करिता आलेल्या महिलेस सिझर करण्याची गरज असल्यास तात्काळ सिजर करण्याची व्यवस्था करण्यात यावी,यावल ग्रामीण रुग्णालय येथे तात्काळ स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यात यावी,
आपातकालिन समयी तात्काळ रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात यावी.
नवजात शिशु यांचे अतिदक्षता विभाग कार्यान्वित करण्यात यावे नियोजनाच्या शस्त्रक्रिया सुरू करण्यात याव्या.
तालुक्यातील धुळेपाडा व टेंभीकुरण या गांवातील दलित - आदिवासी समाजाला पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवले जात असून त्यांना त्यांच्या हक्कापासुन वंचीत ठेवल्या प्रकरणी तसेच टेंभीकुरण गांवाच्या संदर्भात म.आयुक्त नाशिक यांच्या अधिसुचनांची अमंलबजावणी न केल्यामुळे यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांचे विरुद्ध कारवाई करण्यात यावी. यांचे सह तालुक्यातील अनेक समस्यांचे निवेदन सघटनेचे यावल तालुका अध्यक्ष विलास तायडे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले.तसेच येत्या ८ दिवसात मागण्या पुर्ण न झाल्यास तहसिलदार कार्यालय यावल येथे संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमुद करण्यात आले त्या प्रसंगी जिल्हा प्रमुख नंदाताई भावटे,जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव निकम,फैजपुर विभागीय उपाध्यक्ष इकबाल तडवी व अनिल इंधाटे,यावल तालुका युवक अध्यक्ष सागर तायडे,मांगीलाल भिलाला,नानु बारेला,मिलीद सोनवणे,इंदिरा भिलाला, सपना सोनवणे,मनिषा बागुल,विजया सोनवणे,दिपक मेढे ,रविंद्र मेढे,अनिल तायडे,जगन तायडे यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येने महिला - पुरुष कार्यकर्ते आंदोलन मोर्चात सहभागी झाले होते .
टिप्पणी पोस्ट करा