यावल दि.२३
आज शुक्रवार दि.२३ ऑगस्ट २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक संपन्न झाली.
यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष प्रमोदबापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीसाठी रावेर लोकसभा जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र चौधरी,जळगाव लोकसभा कार्याध्यक्ष शालिग्राम मालकर,जळगाव महानगर कार्याध्यक्ष संग्रामसिंग सूर्यवंशी हे जिल्हाधिकारी म्हणून उपस्थित होते जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी तालुक्याचा आढावा घेतला आगामी काळात पक्षाला बळकटी मिळण्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागण्याचे आदेश सूचना दिल्या,तसेच रावेर विधानसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे कार्यकर्त्याना आश्वासन दिले बैठकीच्या सुरवातीस प्रास्ताविकात तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले यांनी आपल्या तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली व बुथ सक्षमीकरण करण्याचे आश्वासन वरिष्ठांना दिले,या कार्यक्रमात नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष व जिल्हा कार्याध्यक्ष यांचे यावल तालुक्याच्या वतीने सत्कार व सन्मान करण्यात आला.या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले माजी नगराध्यक्ष अतुल पाटील,डी.पी.साळुंखे सर ज्योती पावरा,चोपडा विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल साठे,युवक तालुका अध्यक्ष पवन पाटील,
सईदभाई, अन्वर खान, साकळी सरपंच दीपक पाटील,फैजपूर शहराध्यक्ष अन्वर खाटीक,यावल शहराध्यक्ष करीम मण्यार,अमोल दुसाने,हितेश गजरे, डी.एम.पाटील,नरेंद्र पाटील,ललित पाटील,प्रसन्न पाटील,किरण पाटील, सलीम तडवी,समाधान पाटील,दत्रातराय पाटील,बापू जासूद,अरुण लोखंडे
शशिकांत पाटील,कामराज घारू,मोहसीन खान,
सद्दाम खान,निलेश बेलदार,पितांबर महाजन,
मंगलाताई नेवे,ममता आमोदकर,भगवान बर्डे,सहदेव पाटील,गजू पाटील,एजाज मण्यार,नईम शेख,विकी गजरे,किशोर माळी,नरेंद्र शिंदे,सचिन येवले,शेख अन्वर,शेख अशपाक भाई,ललित पाटील,विजय साळी, मयूर पाटील,पिंटू कुंभार,सुरेश कुंभार,राहुल गजरे,उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा