शेळगाव बॅरेजमधुन यावल नगरपालिकेसाठी पाणी आरक्षण प्रस्तावास शासनाच्या जलसंपदा विभागाची मान्यता : माजी नगराध्यक्ष अतुल पाटील

यावल दि.२८ यावल शहराची पुढील ३० वर्षांची लोकसंख्या गृहीत धरून शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पातून कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेस महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाची मंजुरी दि.२३ ऑगस्ट २०२४ मिळाल्याची माहिती माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी दिली.
      याबाबत माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की,यावल शहराला पाणीपुरवठा सुरळीत व नियमित मिळण्यासाठी आराखडा तयार करून दरडोई १३५ लिटर पाणी पुरवठा व्हावा म्हणून यावल नगरपालिकेने जुन २०२१ मध्ये पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजुर करून योजनेचा प्रस्ताव तयार करण्यासाठी नाशिक येथील सल्लागार समिती नेमुन कंपनीस काम दिले होते.त्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता.दरम्यान शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्प या जलाशयातून पाणीपुरवठा योजनेकरीता पाणी आरक्षण मंजुर होणे गरजेचे होते. अखेर या पाणी आरक्षण प्रस्तावास मंजुरी मिळाली. 
       याबाबत सविस्तर वृत्त असे की,यावल नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना होत असलेला पाणी पुरवठा हा सद्यस्थितीत हतनूर धरणाच्या कालव्यातून होत आहे. नगरपालिकेने बांधलेल्या साठवण तलावात पाणी साठवण्यात येऊन जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केलें जाते.
जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पाणीपुरवठ्याच्या टाक्यांमध्ये जमा होऊन शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येतो.हतनूर धरणावरील योजना सुमारे २५ ते ३० वर्षापूर्वी मंजुर असल्याने व हतनूर धरणावर जळगाव जिल्ह्यामधील ८५ ग्रामपंचायती, भुसावळ व वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी,दिपनगर औष्णिक केंद्र, भुसावळ रेल्वे,भुसावळ,यावल,चोपडा,अमळनेर नगरपालिका इ अवलंबून असल्याने भविष्यात हतनूर वरील पाणीपुरवठा योजना यावल शहरासाठी पुरेशी होणार नाही अशी शक्यता गृहीत धरून शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पावरून कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना मंजुर होणेसाठी जुन २०२१ मध्ये यावल नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजुर करून नाशिक येथील कन्सल्टंट कंपनीस प्रस्ताव तयार करण्याचे काम देण्यात आले होते. त्या अनुषंगाने या योजनेचा प्रस्ताव तयार करून तांत्रिक मंजुरी घेण्यात आली आहे. व सदरील प्रस्ताव शासनाच्या प्रशासकीय मंजुरीसाठी मंत्रालय स्तरावर प्रलंबित आहे.दरम्यान प्रस्तावास शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्प या जलाशयातून पाणी पुरवठा योजनेसाठी पाणी आरक्षण मंजुर होणे गरजेचे होते.त्यासाठी नगरपरिषद यावल यांनी अधीक्षक अभियंता तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव यांचे मार्फत प्रस्ताव शासनाच्या जलसंपदा विभागाकडे मान्यतेसाठी पाठविला होता.त्या प्रस्तावास शासनाच्या जलसंपदा विभागाने शासन निर्णय क्र. बिसिआं 2024/(२१४/२०२४) सिं. व्य (धो -२) दि.२३.०८.२०२४ नुसार मान्यता दिली असुन यावल शहर वाशियांसाठी पिण्याच्या पाणीपुरवठा योजनेसाठी शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पातून २.८२दशलक्ष घन मिटर इतके पाणी आरक्षित करण्यासाठी मंजुरी दिली आहे अशी माहिती येथील पालिकेचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी दिली आहे.
**************************************
विरोधी पक्षाचे असताना शासनाचे आभार मानले अतुल वसंतराव पाटील यांनी.   

       हतनूर धरणाच्या पाण्यावर ८५ ग्रामपंचायती व भुसावळ, वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी,दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र.तसेच जळगाव जिल्ह्यातील यावल, भुसावळ,चोपडा,अमळनेर नगरपालिका इ साठीचे पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत.हतनूर धरणावरील यावल शहरासाठीची योजना जुनी झाली आहे.पुढील ३० वर्षांची वाढती लोकसंख्या गृहीत धरून नविन पाणीपुरवठा योजना शहारापासुन जवळ आसलेल्या शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पावरून व्हावी अशी आपली व शहरवासीयांची मागणी होती. म्हणून आम्ही सहकारी नगरसेवक यांच्या सहकार्याने जुन २०२१ मध्ये रीतसर ठराव मंजुर करून नाशिक येथील निसर्ग कन्सल्टंट या कंपनीस परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्याचे काम दिले होते. या योजनेच्या सुमारे ८२ कोटी रूपये च्या अंदाजपत्रकात तांत्रिक मंजुरी घेण्यात आली असुन पाणीआरक्षण प्रस्तावास मान्यता आवश्यक होती.२.८२दश लक्ष घन मिटर इतके पाणी यावल शहरातील नागरिकांना पिण्यासाठी आरक्षित केल्यामुळे योजना कार्यान्वित झाल्यावर प्रती नागरिक १३५ लिटर या प्रमाणे पाणी उपलब्ध होणार आहे. या योजनेस अद्याप प्रशासकीय मंजुरी नसुन शासन स्तरावर प्रलंबित आहे.सदर काम लवकर मार्गी लावण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे,केंद्रीय राज्य मंत्री रक्षाताई खडसे प्रयत्नशील असून जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतुल पाटील यांनी आभार मानले असुन पाठपुरावा करणारे यावल नगर परिषदेचे अभियंता सत्यम पाटील यांचे व मुख्याधिकारी यावल यांचे देखील आभार मानले आहे.
****************************************

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात