यावल दि.२८
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक सुवास देशमुख यांची लाच लूचपत विभाग मुंबई मुख्यालयात बदली झाल्याने त्यांच्या पदाचा कार्यभार बुधवार दि.२७ ऑगस्ट २०२४ पासून मुंबई येथील लाच लुचपत विभागातील पोलीस उप अधीक्षक योगेश गंगाधर ठाकूर यांनी स्वीकारला.
त्याचप्रमाणे जळगाव येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांची नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदली झाल्याने त्यांचा पदाचा कार्यभार नाशिक येथील गुप्त वार्ता विभागातील पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांनी स्वीकारला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,
जळगांव युनिट तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की,कोणत्याही कार्यालयामध्ये कोणी शासकीय अधिकारी / कर्मचारी किंवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,जळगांव
कार्यालयाशी संपर्क साधुन निर्भिडपणे या कार्यालयाकडे तक्रार नोंदवावी.कार्यालयीन वेळेनंतर किंवा सुटीचे दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यप्रणाली बाबत व तक्रारी बाबत माहीती पाहीजे असल्यास खालील नमुद मोबा. क्र.व दूरध्वनीवर संपर्क साधावा.महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या सोईच्या दृष्टीने लाच- लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यासाठी लॅन्डलाईन ते लॅन्डलाईन व मोबाईल ते लॅन्डलाईन अशी टोल फ्री नंबर १०६४ ची सेवा सुरु करण्यात आली असुन सदर क्रमांकावर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यप्रणाली संबंधी व करावयाच्या तक्रारी संबंधी नागरीकांनी खालील नमुद क्रमांकावर संपर्क साधावा.
पोलीस उप अधीक्षक योगेश गंगाधर ठाकुर,मोबा.क्र. :- ९७०२४३३१३१ ला.प्र.वि.लॅन्डलाईन क्र.टोल फ्रि
क्र. ०२५७ २२३५४७७
:- १०६४ आहे
टिप्पणी पोस्ट करा